आज दिनांक 22 जानेवारी रोजी आपल्या दिवा पब्लिक स्कूल या शाळेत माघी गणेश उत्सवनिमित्त आयोजित कार्यक्रमात शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच आपल्या दिवा पब्लिक स्कूल या शाळेला आपल्या संत रोहिदास शिक्षण संस्थेतर्फे शाळेतील वाचनालयासाठी कथा कादंबरी व गोष्टीची 100 पुस्तकांचा संच मोफत देण्यात आला. याप्रसंगी दिवा पब्लिक स्कूल चे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय विनोद पाटील साहेब व त्यांचे मित्र विविध शैक्षणिक संस्थेचे संस्थापक- संस्थाचालक उपस्थित होते. दिवा पब्लिक स्कूल यांच्या वतीने शाळेला मदत केल्याबद्दल संत रोहिदास शिक्षण संस्था सामाजिक व शैक्षणिक फाउंडेशन यांचे आभार मानले
प्रेरणा अंक साप्ताहिक MAGZINE SR DIGITAL EDUCATION VETAL ASHOK
SR Digital Educational Foundation President Ashok Vetal
Saturday, January 18, 2025
Thursday, April 23, 2020
Saturday, April 4, 2020
Free Story Books माझा मोफत वाचन कट्टा
🎨आत्ता वाचा मोफत सुप्रसिध्द लेखकांचे साहित्य 🎨
ऑनलाईन प्रेरणा वाचन कट्टा
चित्रकार-लेखक- माजी मुख्याध्यापक
संस्थापक अध्यक्ष संत रविदास सेवाभावी सामाजिक शैक्षणिक संस्था नवी मुंबई.
श्री. अशोक वेताळ
चांभाराचं पोर अण त्याचा आसूड...
(भाग 2)
"अर.. अश्या.. उठ की र.." "साळत जायचं नाही कारे?" "आज साळचा पहिला दिस हाय.."
नानाचा आवाज ऐकून "अश्या" गडबडून जागा झाला. कशीबशी आंघोळ करून बंडी अंगात चढवली..
फुटकी खापराची पाटी व घोंगडी घेऊन तो तयार झाला. शाळेत जाण्याची उत्सुकता त्यालाही लागली होती.
नाना आणि अश्या झरझर चालत शाळेकडे निघाले. गावाच्या वेशीवर पाटलाच्या पडक्या वाड्यात शाळा भरत होती. फुटकी पाटी व मळकट घोंगड सांभाळत अश्या व नाना शाळेजवळ पोहोचले. जेमते एका छोट्या खोलीत भिंतीला लाकडी फळा टांगला होता. मोडक्या खुर्चीवर गुरुजी बसले होते. वर्गातील दोन-चार बाकड्यांवरती सात आठ मुले दाटीवाटीने बसली होती. खेडे गावत पूर्वी पहिली ते चौथी पर्यंतची शाळा एकाच वर्गात भरत होती. पहिली ते चौथी वर्गांना एकच शिक्षक शिकवत असत.
वाड्याच्या दरवाजात दोघेही थबकले...
गुरुजी कडे पाहून नाना दारातूनच म्हणाला..
गुरुजी मला या माझ्या पोराला साळत धाडायचेय..
बसल्या जागेवर गुरुजींनी आमच्या अवतारा कडे पाहिले आणि म्हणाले..
"तुझ्या पोराच वय काय?"
"असल साडेचार पाच वर्ष.".
नाना अदबीनं म्हणाला..
पोराचे नाव काय?
आश्या.. नानानं उत्तर दिले..
मास्तर आश्चार्यांनी म्हणाले..
मुलाचे नाव कधी आश्या.. असते का? हे तर मुलीचे नाव आहे.
तसा नाना ओशाळला व म्हणाला.. त्याच्या आज्ज्यानं "अशोक" नाव ठेवलं हाए.. पण आम्ही सगळे त्याला" आश्या" च म्हणतो..
अरं नाना तस नाही.. शाळेत हजेरी पुस्तकात खर नाव लिहावे लागत... मास्तर त्रासून म्हणाले.. त्यांनी पुढे विचारले
धर्म व जात कनती?
नानांनी डोके खाली घालून म्हणाला..
"हिंदू चांभार"
हे ऐकून वर्गातील बाकड्यावर बसलेल्या सुवर्ण समाजातील मुलांनी एकच गलका केला..
चांभाराचं पोर.. चांभाराचं पोर...
गुरुजींनी मुलांना गप्प केल आणि नानाला म्हणाले..
एक काम कर तुझ्या पोराला दरवाज्यापाशी घोंगडीवर बसीब.. आण तू निघ....
तसा नाना मागे फिरला. आपला मुलगा शाळेत जाऊ लागला याचा परम कोटीचा आनंद त्याच्या चेहर्यावर दिसत होता. मला शिकता आले नाही पण माझ्या मुलाने खूप शिकाव या साठी त्याची धडपड चालली होती.
“अश्याने” शाळेच्या दरवाजा बाहेर घोंगडी पसरली व त्यावर मांडी घालून बसला. फुटकी पाटी मांडीवर ठेऊन फळ्यावर एक दोन अंक गिरवू लागला. काही वेळाने गुरुजी त्याच्या जवळ आले आणि म्हणाले...
"हे बघ अशोका, तू वर्गाच्या आत यायचं नाही.. इथेच बसून मी जे शिकवतो ते शिकायचं आणि वर्गात कोणत्याही मुलाला शिवायचं नाही, म्हणजे हात लावायचा नाही.
“ अश्याने” मानेनेच हो हो म्हंटले..
“अश्याचा” शाळेचा पहिला दिवस शाळेच्या वर्गाबाहेर शाळेच्या दरवाज्यात सुरू झाला...
शाळा सुटल्यावर “अश्या “ खापराची फुटकी पाटी आणि आपली घोंगडी काखेत दाबून, पाटी सांभाळत घरच्या दिशेला निघाला. आजूबाजूची सुवर्णाची मुलं एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून, गप्पा मारत, हसत खिदळत घरी चालली होती, परंतु “अश्या “कडे मात्र कोणाचेच लक्ष नव्हते.. "अश्या" खाली मान घालून, विचार करत चालला होता.. त्याला कळले नाही, गुरुजींनी आपल्याला वर्गाबाहेर दरवाज्यात का? बसवले, शाळेच्या वर्गात बाकड्यावर का? बसू दिले नाही. पावसाचे दिवस होते रस्त्याने चिखल झाला होता, तसाच चिखल तुडवत तो आपल्या घरच्या दिशेला निघाला निशब्द एकटाच...
क्रमशः.....
लेखक :- श्री. अशोक वेताळ “अशोका”
माजी मुख्याध्यापक- शिक्षण महर्षी कै. रविकांत अणावकर गुरुजी संकुल शिशु विकास मंदिर हायस्कूल कुर्ला मुंबई.
संस्थापक अध्यक्ष- संत रविदास सेवाभावी सामाजिक शैक्षणिक संस्था नवी मुंबई.
विशेष कार्यकारी अधिकारी SEO (महाराष्ट्र राज्य शासन.)
Online प्रसिद्धी हक्क..
S. R. EducationalSantha Navi Mumbai
Saturday, March 28, 2020
Creative Child ART Drawing and Paintings Exhibitions Corona Virus Fight From Child Artist
चित्रकार-लेखक-माजीमुख्याध्यापक श्री. अशोक वेताळ
सौ. एम. ए. वेताळ
संत रोहिदास शिक्षण संस्था
SR Digital Education
Sunday, January 5, 2020
Sunday, December 15, 2019
CORONA Aani Samaj Prabodhan कोरोना आणि समाज प्रबोधन, लेखक, कवी, संत व संतांचे कार्य
लेखक....
मित्र हो, आज गुढीपाडवा समस्त हिंदूंचा सण, पण आज आपल्या संपूर्ण देशावर व जगभरात कोरोना चे सावट आहे,फार मोठे संकट आहे,म्हणून या शुभदिवशी आपण संकल्प करूया,मी स्वतः घरीं राहीन,सावध व सतर्क राहीन, मी स्वतःला सांभाळीन व इतरांना माझ्यामुळे त्रास होणार नाही असा वागेन,या संकटाला तोंडं देण्यासाठी व पळवून लावण्यासाठी मला जे जे करता येईल ते अवश्य कारेन,सरकारी यंत्रणेला सहकार्य
Monday, December 9, 2019
Sunday, June 23, 2019
DSM DIGITAL SCHOOL MISSION,DOCUMENTARY FILM HISTORY SHORT FILMS CHANEL
1 ) RAY GAD FORT KILLA / RAI GADH KILLA
रायगड किल्ला -
CLICK HEAR ⇓
रायगड किल्ला -
CLICK HEAR ⇓
Monday, June 17, 2019
DSM Diploma In School Management Admission And DSM Examination Question Paper
Correspondence B Ed Course
Addmission Link
https://g.co/kgs/nnkTyT
👇👇👇
DSM COURSE DIPLOMA IN SCHOOL MANAGEMENT
Wednesday, May 22, 2019
ASHOK VETAL ADARSH SHIKSHAK PURSKAR THE BEST TEACHER AWARD MY MEMORIES
Saturday, April 6, 2019
Saturday, April 14, 2018
NEW WRITERS E BOOK LIBRARY ऑनलाईन लेख संग्रह, पुस्तक संग्रह व कव्या संग्रह...
तुमच्यातील कवी, लेखक जागृत करूया.......श्री. अशोक वेताळ
शैक्षणिक,धार्मिक,सांस्कृतिक,सामाजिक प्रबोधन विषयक पुस्तक लेख कविता या शैक्षणिक ब्लोग वर शेअर करा.या शैक्षणिक ब्लोग चा उपयोग विदयार्थी,पालक, शिक्षक व समाजातील प्रत्येक घटकाला होईल अशी मी अशा बाळगतो. धन्यवाद !!!
Mrs. Sneha Kamlesh Kesarkar
ती ...आणि फक्त तीच...
रिमझिम पाऊस... थंडगार वारा... टप टप पडणारे पाण्याचे थेंब... बेधुंद पणे वाहणाऱ्या, बनवलेल्या कागदाच्या बोटी... आणि प्रत्येक बोटीवर प्रत्येकाने स्वछंदपणे लिहिलेले ध्येयाचे ठिकाण...
Subscribe to:
Comments (Atom)
दिवा पब्लिक स्कूल, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व वाचनालयासाठी मोफत पुस्तक वाटप
आज दिनांक 22 जानेवारी रोजी आपल्या दिवा पब्लिक स्कूल या शाळेत माघी गणेश उत्सवनिमित्त आयोजित कार्यक्रमात शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार...
POPULAR POSTS
-
लेखक- श्री. अशोक वेताळ DSM Project इतिहास विषयाच्या अभ्यासाची विद्यार्थ्यांमध्ये रुची नसल्याची कारणे शोधून त्यावर उपाययोजना...
-
आज दिनांक 22 जानेवारी रोजी आपल्या दिवा पब्लिक स्कूल या शाळेत माघी गणेश उत्सवनिमित्त आयोजित कार्यक्रमात शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार...
-
तुमच्यातील कवी , लेखक जागृत करूया.......श्री. अशोक वेताळ शैक्षणिक , धार्मिक , सांस्कृतिक , सामाजिक प्रबोधन विषयक पुस्तक लेख क...
-
Correspondence B Ed Course Addmission Link https://g.co/kgs/nnkTyT 👇👇👇 BEd Addmission Link DSM COURSE DIPLOMA IN SCHOOL MANAG...
-
CREATIVE Child ART drawing and painting online EXHIBITION ही संकल्पना आम्ही राबवत आहेत. या साठी छोट्या दोस्तांनो तुम्ही स्वतः काढलेली ...
-
संत रोहिदास महाराज जिवन चरित्र संत रोहिदास जयंती निमित्त लेख... *तारामंडलातील तेजस्वी तारा म्हणजे संत रोहिदास आहेत!* --------------------...
-
1 ) RAY GAD FORT KILLA / RAI GADH KILLA रायगड किल्ला - CLICK HEAR ⇓ https://www.youtube.com/watch?v=_k5D1LHNAT4
-
मोफत आणि सहज सोपे बेसुमार मराठी पुस्तकं वाचा मोफत वाचनालय लिंक
-
लेखक... . श्री. प्रकाश बुधाजी परब मित्र हो, आज गुढीपाडवा समस्त हिंदूंचा सण, पण आज आपल्या संपूर्ण देशावर व जगभरात कोरोना चे सा...
-
VETAL ASHOK काही क्षण चित्रे ARTIST And ME MEMORIES सिने अभिनेते शशांक केतकर सोबत क्षणचित्रे





















