Sunday, December 15, 2019

CORONA Aani Samaj Prabodhan कोरोना आणि समाज प्रबोधन, लेखक, कवी, संत व संतांचे कार्य


लेखक...
श्री. प्रकाश बुधाजी परब
मित्र हो, आज गुढीपाडवा समस्त हिंदूंचा सण, पण आज आपल्या संपूर्ण देशावर व जगभरात कोरोना चे सावट आहे,फार मोठे संकट आहे,म्हणून या शुभदिवशी आपण संकल्प करूया,मी स्वतः घरीं राहीन,सावध व सतर्क राहीन, मी स्वतःला सांभाळीन व इतरांना माझ्यामुळे त्रास होणार नाही असा वागेन,या संकटाला तोंडं देण्यासाठी व पळवून लावण्यासाठी मला जे जे करता येईल ते अवश्य कारेन,सरकारी यंत्रणेला सहकार्य 

करेन,डॉक्टर, नर्स,ओर्डबॉय, सफाई कामगार, ambulance चे चालक,ड्रायव्हर, जे अत्यावश्यक सेवेत आहेत त्या सगळ्यांना शतशः आभार, परमेश्वरा या सर्वांना शक्ति दे, धैर्य दे आणि त्यांचे आरोग्य सांभाळ,यासाठी सर्वांनी प्रार्थना करूया,प्रार्थनेत प्रचंड शक्ती आहे,आपण एकत्रीत अथवा एकट्याने केलेलीं प्रार्थना निसर्गशक्तीपर्यंत नक्की पोहोचेल, शासन वारंवार करत असलेल्या आवाहनाला आपण प्रतिसाद देऊया,आज सर्वनी भारतमातेच्या रक्षणार्थ प्रार्थना करूया की हे कोरोनाच्या संकटाचे निर्मुलन कर,या भारतमातेच्या रक्षणार्थ अनेक क्रांतिवीरांनी रक्त सांडले, तुरुंगवास भोगले आपण फक्त घरात राहून या भारतमातेला वाचवूया, गुढीपाडव्याच्या निमित्त कोणत्याही खरेदीसाठी घराबाहेर पडू नका,आपण वाचलो तर पुढील अनेक गुढीपाडवे खूप जोमाने साजरे करता येतील, खुप खूप शुभेच्छा, 
सधान्यवाद।

लेखक.... 
श्री. प्रकाश बुधाजी परब Shri Prakash Parab


कोरोना व आपली भारतीय संस्कृती 

काल परवा पर्यंत पाश्चात्यांचे अंधानुकरण करणे आणि स्वतःच्या भारतीय जीवन पद्धतीस मागास समजण्यात धन्यता मानत होतो. पण कोरोनाच्या महामारीने जगाला झुकवलं, घरात कोंडून घ्यायला भाग पाडलं तेंव्हा आपल्या भारतीय जीवन पद्धतीवर नव्याने विचार करावासा वाटला. खालील काही प्रशांची उत्तरे आपसूक मिळाली.
१. पूर्वी संडास, आणि हातपाय धुवायला सोय घराबाहेर का असायची? क्वचित अंघोळीसाठीही.
२. अंत्यसंस्कार किंवा केशकर्तनावरून आल्यावर  अंघोळीशीवाय कोणाला शिवायचीही परवानगी का नसायची?
३. चप्पल घराबाहेर सोडूनच घरात प्रवेश का?
४. घरात मृत्यू झाल्यावर १२ दिवस घरातून बाहेर पडण्याची परवानगी का नसायची? (यालाच होम क्वारंटाईन म्हणावे का?) काही ठिकाणी नवीन जन्म झाल्यावर काही दिवस बाळ आणि बाळाच्या आईला घरातल्याच एका खोलीत क्वारंटाईन करायचे. त्या खोलीच्या दाराला कडुनिंबाच्या पाल्यांचे तोरण बांधायचे.
५. मयत झालेल्या घरात १२ दिवस अन्न शिजवायचे नाही अशी पद्धत का असावी? १२व्या नंतर घरात साफसफाई का करतात?
६. शौच करण्याची भारतीय पद्धत का प्रचलित आहे? (आतड्यांना लॉक करणारे मसल्स अनलॉक झाल्याने मलाचा पूर्ण निचरा होतो, टॉयलेट पेपरची गरज नाही त्यामुळे इको-फ्रेंडली आहे, पाश्चात्य कामोडच्या सीटवरच्या लाखो विषाणूंचा डायरेक्ट शरीराला संपर्क होतो तसा भारतीय पद्धतीत होत नाही)
७. हळद आणि मसाले युक्त अन्न शरीराच्या प्रतिकार शक्तीला आपसूकच बळ देतात. लग्नाआधी हळदी समारंभ का असतो?  आता गोरे लोकही हळददूध प्यायला लागलेत, फरक एवढाच की ते त्याला 'टर्मरिक लाटे' म्हणतात.
८. घरात उद, कापूर जाळणे धूप फिरवणे यामागे काय कारण असावे?
९. ऋतुमानानुसार सणवार आणि अन्न नियोजन यामागे किती मोठा विचार असेल? उन्हाळा सुरू व्हायच्या आधीचा काळ हा वायरल इन्फेक्शनचा असतो. या काळातच दारोदारी होळी का पेटवली जाते? आपण शास्त्रोक्त पद्धतीने ठराविक आयुर्वेदिक झाडपाल्यांचा वापर करून पेटवतो की नाही? 
१०. आपल्याकडे जनरली मृतदेह दफन करण्याऐवजी दहन करायची पद्धत का रूढ आहे? गुगल करा "cremate or bury". अनेक संशोधने मिळतील. तिकडे चीनने मृतदेहांना पुरण्या ऐवजी जाळण्याचे आदेश दिलेत.
११. जगातला सगळ्यात जास्त शाकाहारी असलेला देश भारतच आहे. असे का? इथे भारतात आपण प्राण्यांत पण देव पाहतो. झाडांमध्ये, दगडांमध्ये, नद्यांमध्ये, पर्वतांमध्ये ही! आम्हाला जगाने इको-फ्रेंडली व्हा हे शिकवणे म्हणजे मोठा विनोद आहे. आमच्या गोमातेची, गो भक्तीची चेष्टा होते. आम्ही कुत्र्यात पण देव पाहतो, खंडोबा म्हणतो. तिकडे चीनच्या युलीन फेस्टिवल मध्ये कुत्र्यांना भाजून खातात. 
१२. एकाही व्हायरसचा जन्म भारतातून झाला आहे असे ऐकिवात का नाही? कारण आम्ही इकडे वटवाघूळ, उंदीर, मांजर कुत्री, ऑक्टोपस, साप, रातकिडे, अळ्या असे बेछूट खात नाही. सामिष खाण्यातही नियम आहेत ते पाळतो.
१३. उठसुठ हात मिळवणे, मुके घेऊन अभिवादन करणे असे प्रकार आपल्याकडे नसून हात जोडून नमस्कार करायची पद्धत का आहे?
आपली संस्कृती हजारो वर्षांपासून अस्तित्व टिकवून आहे. अनेक महामाऱ्या आणि संकटे झेलून अनुभव संपन्न झाली आहे. आमचीच संस्कृति किती वैज्ञानिक आहे याचा ढोल बडवायचा यात उद्देश अजिबात नाही. हे केवळ अनुभवातून शिकणे आणि कॉमन सेन्सचा भाग आहे. स्वतःच्या संस्कृतीला कमी समजणे आणि वेस्टर्न तेच योग्य ही विचारसरणी कोरोना पेक्षा घातक आहे. यावर विचार व्हावा

संग्राहक... 
श्री. अशोक वेताळ 
 🙏🙏🙏


निसर्गावर मात करु पाहणारा मानव घरात बंदिस्त।
                                          ज्या मार्च महिन्यात अब्जावधी ची उलाढाल 
होते ,अर्थयंत्रणेला रात्रंदिवस काम असत तोच मार्च महिना,परंतु याच महिन्यात परदेशातून कोरोना आला,साऱ्या जगाला कापर भरवणारा सगळ्याना घरात बसवणारा एक सूक्ष्म जीव,
निसर्गावर मात करू पाहणारा मानव कल्पना ही करू शकत नाही असा एक आजार , ज्याला आवरण्यासाठी प्रगत राष्ट्रे ही हतबल झाली , जगातील अमेरिकेसारख्या प्रगत देश कोरोनाच्या विळख्यात सापडला नव्हे तर कोलमडली, अर्थव्यस्थेने तोंडाला मास बांधले,मृत्यूचे तांडव मृतांचा खच पडला,
देव देव्हाऱ्यात बंद झाले,तर मानव घरात,देव देव म्हणून दानपेटीत गुप्त दान करनारे आता कोणाकडे जीवदान मागणार असा प्रश्न पडला आहे ,सत्ता संपत्ती साठी धडपडणारे घरातील पिंजऱ्यात अडकले,माणूस माणसाला हीन समजू लागला, संपत्तीची स्पर्धा संपत आली,रस्ते सुनसान झाले,धनदांडग्याच्या गाड्या स्थिरावल्या , नेते भूमिगत झाले,
गोरगरिबांच्या चिंता वाढल्या,मजूर गावाकडे निघाले,गावच्या वाटा भीतीने बंद झाल्या, भिकारी उपासमारीने मरू लागले,
शहर आणि देशाच्या वाहिनीची धडधड थांबली आणि वेळोवेळी येणाऱ्या बातम्यांनी माणसाची धडधड वाढली,
देवळतल्या देवांची जागा डॉक्टर आणि नर्स ने घेतली, सफाई कामगार देवदूत झाले,पोलिसांचा इतर ताण कमी झाला पण माणसे आवरण्याचा वाढला,
सत्तेत येण्यासाठी धडपडणाऱ्या सरकारची कसोटी लागली,
देव-धर्म ,जप-तप, होम,हवन यापेक्षाही महत्वाचा मंत्र ठरला मी घरात राहीन , एरवी मानवाला घाबरून जीव मुठीत घेऊन जगणारे पशु पक्षी स्वच्छंदी फिरू लागले,हे सगळे एका सूक्ष्म जीवने केले,

लेखक- प्रकाश बुधाजी परब

कवी :- श्री सुनील पवार Shri.Sunil Pawar
👽 कोरोना भावा 👽*
*कोरोना भाऊ,  नको मागं धावू,*

*घालतीया साकडं रे*
*घालतीया साकडं कोरोना*
*घालतीया साकडं रे. . . . . . ।।धृ।।*
*नाक तोंड बांधून बाहेर जाईन*
*अंतर ठेवून भाजी घेईन*
*गर्दीच्या ठाई,  जाणार नाय बाई*
*ठेव तू धड धाकडं रे*
*घालतीया साकडं कोरोना*
*घालतीया साकडं रे. . . . . .।।१।।*
*गरमागरम घेईन पाणी*
*सॅनिटायझरला ठेवीन ध्यानी*
*धुवेन हात,  नको तुझी साथ*
*करू नको काही वाकडं रे*
*घालतीया साकडं कोरोना*
*घालतीया साकडं रे. . . . . . .।।२।।*
*विनाकारण खाली जाणार नाय*
*सरकारी सूचना ध्यानी ठेवल्या हाय*
*मुंबई जान,  गळ्याची आन*
*नको स्वप्नांचं तुकडं रे*
*घालतीया साकडं कोरोना*
*घालतीया साकडं रे . . . . . .।।३।।*
*राजा रंकांची खंत नाही तुला*
*उचलून नेतोय पाहिजी त्याला*
*वाट नको पार, जीवाला घोर*
*नको मसणात लाकडं रे*
*घालतीया साकडं कोरोना*
*घालतीया साकडं रे . . . . . .।।४।।*


*कवी :- श्री सुनील पवार*

श्री. अशोक खाडे MR.ASHOK KHADE

मराठी माणुस ....व्यवसाय करू शकत नाही ????

वाचा श्री अशोक खाडे यांच्या यशाचा मार्ग
ज्या गावात "दगडू चांभाराचा "मुलगा अशी ओळख होती, ते गाव आता "आबा' म्हणून ओळखत आहे. आजही ते तीनही भाऊ एकत्र कुटुंब म्हणून राहतात एकत्र कुटुंबात जी ताकद आहे, ती कशातच नाही. त्या भक्कम आधारामुळेच ते आयुष्यात काही तरी करू शकले ''
घरची प्रचंड गरिबी. बुद्धिमत्ता हेच भांडवल. पेड (ता. तासगाव, जि. सांगली) येथे प्राथमिक शिक्षण घेतलेल्या युवकाने मोठ्या भावाच्या मदतीने मुंबईची वाट धरली. "जमेल ती भाषा, मिळेल ते काम आणि पडतील ते कष्ट' हे ब्रीद घेऊन व्यवसायात शिरलेले अशोक खाडे यांच्या "फॅमिली'चा विस्तार आज साडेचार हजार कर्मचारी आणि सुमारे साडेपाचशे कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या "दास ऑफशोअर' कंपनीत झालाय.वारकरी वृत्तीचे असलेले खाडे यांचा ज्ञानेश्‍वरीवर गाढा विश्‍वास. जमशेठजी टाटा, त्यांचे आदर्श. एक रुपयातील एक भाग समाजासाठी, एक भाग देवासाठी, एक भाग कामगारांसाठी आणि उर्वरित भाग स्वतःसाठी अशी त्यांनी उत्पन्नाची वाटणी केलीय. वर्षभर बीएमडब्ल्यूमध्ये फिरणारे खाडे पंढरीची पायी वारी करतात. ज्या चित्रा टॉकीजजवळील झाडाला टेकून वडील गटई काम करत होते, त्या झाडाला समोरून जाताना न चुकता नमस्कार करतात. खाडे यांनी मास्टर इन फिलॉसॉफी पूर्ण केले असून, संत ज्ञानेश्‍वर महाराजांवर पीएचडी करण्याचा विचार आहे.वडील चर्मकार. आई, बहीण दुसऱ्याच्या शेतात काम करीत...कधी-कधी भांवडांनाही कामाला जावं लागायचं.....आयुष्यानं दिलेल्या चटक्‍यांच्या आठवणी अशोक खाडे सांगतात सातवीपर्यंत पेडला शिक्षण झालं. पुढील शिक्षणासाठी तासगावला बोर्डिंगमध्ये राहायला लागलो. त्यांनी शिकावं म्हणून वडील व मोठ्या भावाचा जीव तुटायचा. शिक्षणासाठी घरचे किती कष्ट घेतायेत, याची जाणीव असल्यानं रात्र-रात्र झोप लागायची नाही. बोर्डिंगला पोटभरीचं जेवण मिळायचं नाही. पण मोठं व्हायचं स्वप्न असल्यानं कोणतीही तक्रार नव्हती. सन 1972 ला चांगल्या गुणांनी अकरावी झालो. त्या वर्षी मोठा दुष्काळ पडला. अंगात घालायला कपडेच नाही, तर पायताण कोठून येणार. मग त्यांना शिकविणारे देसाई सर कळवळले. त्यांनी शर्ट व पायजमा घेऊन दिला. अकरावीच्या ऐन परीक्षेला पेनची निफ तुटली. जोशी सरांनी अडचण समजून घेत निफ आणून दिली. साठ टक्के गुण पडले. आज त्याच्याकडे हजारो रुपयांचा पेन आहे; परंतु अकरावीतील "त्या' पेनची किंमत कशालाही नाही. आजही तो पेन आहे. वडील बोर्डिंगवर त्यांना भाकरी घेऊन यायचे आणि म्हणायचे, "राजांनो, गरिबी आणि दुष्काळ मी आणला नाही. तुम्ही धीर सोडू नका. माळावर जोपर्यंत पळस आहे तोपर्यंत आपल्याकडे गरिबी आहे, असे समजू नका. खूप शिका.' वडिलांचे शब्द काळजाला भिडले,''खाडे कुटुंबीयांनी सन 1975 ला मुंबई गाठली. वैद्यकीय शिक्षण घ्यावे अशी त्यांची इच्छा होती, पण रोजीरोटीसाठी तिघेही भाऊ माझगाव डॉकमध्ये नोकरी करायला लागले ते डिझाइन विभागात होते मोठ्या भावाच्या आग्रहामुळे इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. नोकरी आणि शिक्षण दोन्ही सुरू झाले. सन 1983 मध्ये कंपनीच्याच कामासाठी जर्मनीला जाण्याची संधी मिळाली. नवीन उमेद निर्माण झाली होती. गरिबी तर टोचत होतीच, स्वतःचे काही तरी करायचा ध्यास घेतला. त्यातून सन 1992 मध्ये नोकरीचा राजीनामा दिला. अन्य भावांनीसुद्धा राजीनामा दिला. तिघेही एकत्र राहत होतो आणि घरात एक प्रकारचे इंजिनिअरिंगचेच वातावरण होते. गरिबीत आयुष्यभर जगण्यापेक्षा थोडेच आयुष्य जगू; परंतु ते चांगले असेल असा ध्यास घेऊन "दास ऑफशोअर'ची निर्मिती झाली. मराठी माणूस, त्यातही खाडे आडनाव म्हटल्यावर कोण काम देणार, हा प्रश्‍न होताच. त्यामुळे तिघा भावांच्या नावांची आद्याक्षरे घेऊन (दत्तात्रय, अशोक आणि सुरेश) कंपनीला "दास' नाव दिले. नावसुद्धा "के. अशोक' असे सांगायचे पहिले काम माझगाव डॉकमध्येच मिळाले. मुंबईतील पहिला स्कायवॉक बांधला. मग मागे वळून पाहिले नाही.''"दास' कंपनीने ओएनजीसी, ब्रिटिश गॅस अशा नामवंत कंपन्यांसाठी भरसमुद्रात प्रकल्प बांधणीचे काम केलेय. या समूहाच्या इंजिनिअरिंग, डेअरी, ऍग्रो प्रॉडक्‍ट्‌स, रस्ते बांधणी, उड्डाणपूल अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत सात कंपन्या आहेत. अबुधाबीचे प्रिन्स शेख महमंद बिन खलिफा बिन झायर अल नयन यांच्याबरोबर व्यावसायिक भागीदारी केली आहे .आज त्यांना मराठी असल्याचा त्यांना प्रचंड अभिमान आहे. 'त्याच्या कंपनीत चेहऱ्यावर चिंता असलेला एकही कर्मचारी दिसणार नाही. ज्या शेतात त्यांची आई शेतमजूर म्हणून काम करत होती, ती शेती आज त्यांनी विकत घेतली आहे. अशोक खाडेंचा "गुरुमंत्र' "जमेल ती भाषा, मिळेल ते काम आणि पडतील ते कष्ट' हे ब्रीद लक्षात ठेवा.कष्ट करा. प्रामाणिक कष्टांचे फळ नक्की मिळेल. आईवडिलांना, समाजाला कधी विसरू नका.

संतोष द पाटील

Sant Rohidas Ravidas Jivan Charitar,Charmkar Samaj Rachana





धन्यवाद !!!!!!!!!!!!!
संग्राहक
VETAL ASHOK



वेताळ वेतोबा देव --- कोकणाचा वैभवशाली इतिहास --- संग्रहित माहिती


श्रद्धा जगण्यासाठी बळ देते हे नक्की! कोणी ती कोठे, कशी आणि किती ठेवावी हा ज्याचा त्याचा प्रश्न. बहुरंगी, बहुआयामी भारतीय संस्कृतीत विविधतेतही लोकांची देव-देवतांवर दृढ श्रद्धा, भक्ती असणे हे एक सर्वमान्य सूत्र किंवा समान धागा आहे. जो सगळ्यांना एकत्र बांधून ठेवतो. तो त्या त्या प्रांताची संस्कृती, तेथील मंदिरांची दिनचर्या, पूजापाठ, वार्षिक उत्सव व साजरे होणारे सण यांमध्ये प्रतिबिंबित होतो.
वेगवेगळ्या प्रांतांची संस्कृती म्हणजे हजारो वर्षे भारतात दृढमूल होऊन राहिलेल्या पवित्र भारतीय संस्कृतीचा अखंड वाहता प्रवाह आहे. परंतु गावागावांचा इतिहास कोणी लिहून ठेवला नाही. निसर्गसंपन्न कोकण नररत्नांची खाण आहे. त्या पुण्यभूमीतील खेड्यांनाही (जी झपाट्याने शहरे बन आहेत) प्रवाही इतिहास आहे. तो लिहिला गेला पाहिजे.
ती गावे ग्रामदेवतांच्या व अन्य देवदेवतांच्या अधिपत्याखाली शतकानुशतके चालत आली आहेत. त्या गावांचा इतिहास हा मुख्यत: देवस्थानांचा इतिहास होय. मानापमान व न्यायदान या सर्व बाबतींत देवस्थानांचा अधिकार श्रेष्ठ होता. आता राजकारणी, पुढारी, ह्यांचे वर्चस्व असू शकते, पण आजही पुरातन दैवी कायदे पाळले जातात ते प्रथा किंवा वहिवाट म्हणून.
उपरोक्त पार्श्वभूमीवर, कोकणातील निसर्गरम्य डोंगरांनी वेढलेल्‍या, गूढ, घनदाट हिरवाई ल्यालेल्या आणि सुंदर समुद्रकिनारा लाभलेल्‍या दोन देवस्थानांना भेट द्यायचा योग आला. देव वेतोबा हे आरवलीचे भूषण व मुख्य आकर्षण तर आजगावचा देव वेतोबा हे एक सुंदर, संपन्न ठिकाण आहे.
वेतोबा म्हणजे वेताळ. तो शिवभक्त आणि भूतपिशाच्चांचा अधिपती होय. त्‍याचा पुराणकालीन संदर्भ असा की, त्‍याच्‍याकडून ‘शिवा’कडे भैरव म्हणून काम करत असताना पार्वतीच्या बाबतीत आगळीक घडली आणि शंकराने त्याला शाप म्हणून मनुष्यजन्म देऊन पृथ्वीवर पाठवले. दुसरी कथा अशी की, पार्वतीच्या शापाने वेताळ पृथ्वीवर आला. मग त्याने शिवाची उपासना केली आणि शिवगणात स्थान मिळवले. महाभारताच्या शल्यपर्वात त्याला शस्त्रधारी स्कंदानुचर व त्याच्या आईला स्कंदानुचरी मातृका असल्याचे म्हटले आहे. भागवत, मत्स्यपुराण इत्यादी ठिकाणी वेताळाचा शिवगण म्हणून उल्लेख येतो.
वेताळ सदैव युद्धोधत व शस्त्रधारी सैनिक आहे. मराठी संतवांङ्मयातही वेताळ आणि त्याचे अनुचर यांचा युद्धप्रसंगी आढळ होतो. शिव हा भूतपिशाच्च्यांच्या प्रभावळीत वावरणारा स्मशानात हिंडणारा आणि गळ्यात रुंडमाळा घालणारा आहे. त्याने वेताळाला पिशाच्चांचे अधिपत्य दिले. त्याला ज्वालावेताळ, प्रलयवेताळ व अग्नि किंवा आग्यावेताळ अशी नावे आहेत. भारतात अनेक ठिकाणी त्यांची देवळे आहेत.
अष्टभैरवांपैकी एक असा हा वेतोबा!  सिंधुदुर्ग जिल्हा, गोवा येथे त्याला ग्रामदेवता, ग्रामसंरक्षणकर्ता असे बिरुद मिळाले आहे. हा भूतनाथ त्‍याच्‍या सैनिकांसह गावात रात्री संचार करतो. त्यावेळी त्याच्या हातात एक दंडा आणि खांद्यावर घोंगडी असते असे म्हणतात. त्या संचारात त्याच्या वहाणा (चपला) झिजतात. म्‍हणूनच वेतोबाला भेट म्‍हणून त्‍याच्‍या भक्‍तांकडून वहाणा देण्‍याची प्रथा आहे. वेतोबाच्‍या आरवली येथील मंदिरामध्‍ये भक्‍तांनी अर्पण केलेल्‍या मोठमोठ्या आकाराच्‍या वहाणा पाहण्‍यास मिळतात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात, वेंगुर्ला तालुक्यात, ओरोस येथून सुमारे चाळीस किलोमीटरवर आजगाव स्थित आहे. ते कोकणपट्टीतील अतिप्राचीन गाव. गावाला किती वर्षे झाली हे सांगणे कठीण आहे. तो गाव मुख्यत: शिवपंचायतन प्रमुख असा गाव आहे. सर्वेश्वराचे प्राचीन स्वयंभू देऊळ, त्यासमोर आदी चामुंडेश्वरी, रस्त्यालगतचे सूर्यनारायणाचे प्राचीन मंदिर, रवळनाथ, वेताळ व भूमिकादेवी ह्यांची मंदिरे ही सारी वेताळपंचयतनात म्हणजे शिवपंचायतनात येतात.
आजगावच्या देव वेताबाचे मंदिर म्हणजे ह्या गावच्या लोकांच्या सुबत्तेचे, उच्च अभिरूचीचे आणि श्रद्धेचे रूप आहे. आधुनिक पद्धतीने जीर्णोद्धार झालेले हे मंदिर खूप सुंदर आहे. आतबाहेर सर्व परिसर स्वच्छ आहे. सभामंडपात वरती चारी बाजूंनी कठडे असलेल्या गॅल-या आहेत. खाली दोन्ही बाजूंला बैठका आहेत. तेथून गाभा-यात शिरले, की उंच, काळीकभिन्न, शुभ्र वस्त्रांकित वेतोबाची मूर्ती दिसते. बाहेरच्या बाजूला देवाचे तरंगपालखी, छत्र्या दिसल्या.
कोठलेही काम, आरंभ, समस्या ह्यांचा हल वेतोबाला कौल लावून होतो. कौल घेणे ही प्रथाच आहे. नवस बोलले जातात व ते पूर्ण होतातच. मग ते फेडताना वेतोबाला तेथीलच चर्मकारांनी बनवलेल्या चामड्याच्या चपलांचा जोड अर्पण करावा लागतो. त्‍या चपलांचे तळ नंतर झिजलेले आढळतात अशी समजूत आहे. तेथे बाहेरच्या सभामंडपात चपलांचे अनेक जोड मांडलेले होते. नवस फेड म्हणून प्राप्त झालेल्या त्या चपलांत एक खूप मोठा आणि सुंदर जोड होता. तो हरणाच्या कातड्याचा होता म्हणे. सभामंडपाच्या आत शिरताना उजव्या हाताला देवी भूमिकाचे देऊळ आहे. तिला छान साडी नेसवली होती. ती देवी दागिन्यांनी मढलेली होती.
आजगावच्या लोकांची वेतोबावर अढळ श्रद्धा आहे आणि त्याच्या कृपेबरोबरच त्यांच्यावर सरस्वती आणि लक्ष्मीचाही वरदहस्त आहे. त्यांनी सगळ्या क्षेत्रांत नावलौकीक आणि गौरव प्राप्त केला आहे. देवळाच्या परिसरात किमान सुखसोयी असलेली एक धर्मशाळाही आहे. वेळोवेळी बाहेर स्थायिक झालेले तेथील ग्रामस्थ आणि पाहुणे-रावळे ह्याचा लाभ घेतात. देवळात चैत्रापासून फाल्गुनपर्यंत निरनिराळ्या तिथीनुसार भजन सप्ताह, भाटाचा जागर, दसरा, कार्तिक स्नान, दशावतारंभ, वैकुंठ चतुर्दशी असे सोहळे पार पडतात. पालखी, जत्रा, उत्सव, तरंग सर्व उत्साहाने होते.
कोणत्याही कामाचा शुभारंभ वेतोबाला कौल लावूनच केला जातो. भुताखेताने झपाटले तरी त्यावर उतारा घेण्‍यासाठी लोक वेतोबाकडे येतात. प्रभू मतकर हे प्रमुख मानकरी. मडवळ, सुतार, ब्राह्मण ह्यांनाही मानपानात स्थान असते. त्यांनाही नेमून दिलेली कामे असतात. योग्य ते खांबये निवडले जातात. काहींच्या अंगात देवाचा संचार होतो. वारं अंगात येते आणि ते प्रश्नांची उत्तरे देतात. आजगावमध्ये संचारी व्यक्ती बोलत नाही, खाणाखुणा करते. त्यामागे आख्यायिका आहे. (या आख्‍यायिकेचा शोध घेत आहोत. ती उपलब्‍ध होताच लेखात समाविष्‍ट केली जाईल.)
वेंगुर्ल्याहून आरवली तेरा किलोमीटरवर आहे. देव वेतोबाचे आरवलीतळ देवस्थान हे एका बाजूला समुद्र, अवतीभोवती नारळ-पोफळी, काजू व फणसाच्या बागा आणि डोंगर यांनी वेढलेले निसर्गचित्र आहे.
आरवलीबद्दल असे वाचले होते की, विजयनगरच्या हिंदू साम्राज्यात हरवल्ली नावाने अस्तित्त्वात असलेल्या गावाचे नाव कालौघात बदलून आरवली झाले. हर म्हणजे शिव आणि वल्ली म्हणजे वस्ती. पूर्वी ह्या क्षेत्राच्या आसपास ब-याच शिवमंदिरांची मालिका असावी म्हणून हरवल्ली! नाथपंथीय सिद्धपुरुष श्री भुमैया यांनी आरवलीचे देऊळ सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात स्थापन केले असे म्हणतात. सांप्रत मंदिर इसवी सन १६६० मध्ये बांधल्याचा तर पुढचा सभामंडप इसवी सन १८९२ ते १९०० च्या सुमारास बांधल्याचा उल्लेख आढळतो.
मंदिरात प्रवेश करताच भव्य अशी वेतोबाची मूर्ती नजरेत भरते. नऊ फुटाच्या आसपास उंची असलेली ती मूर्ती पंचधातूंची आहे. वेतोबा एका हातात लांब तलवार घेऊन उभा आहे. पूर्वी मूर्ती फणसाच्या लाकडापासून बनवत म्हणून त्या गावात फणसाचे लाकूड बांधकामात व इतर व्यवहारात वापरत नाहीत असे कळले. १९९६मध्ये भक्तांनी पंचधातूंची मूर्ती उभारली. देवाला केळीचे घड अर्पण होतात.
देवळाच्या गाभा-यात वेतोबाच्या बाजूला श्रीदेव भुमैय्या, श्रीदेव पूर्वांस, श्री देवरामपुरुष, श्रीदेवबाराचा पूर्वंस (निरंकारी) आणि श्रीदेव भवकाई विराजमान आहेत. ह्या देवळातही चैत्रपाडवा, रामनवमी, चैत्रपौर्णिमेचा जागर, वैशाखात तीन दिवस मोठा उत्सव, ज्येष्ठात बापू-मामाचा पाडवा, आषाढात महारुद्र होतो. ह्यात आरत्या, पालखी उत्सव व जपांचा समावेश असतो. देव वेतोबाच्या समोर असलेल्या सातेरी देवी मंदिरातही सण, उत्सव, जत्रा साज-या  होतात.
समाजावर असणारा देवळांचा प्रभाव, श्रद्धा ह्यांना एक सकारात्मक वळण देऊन, आरवली देवस्थान विश्वस्तांनी आरवली वैद्यकीय संशोधन केंद्र, लालजी देसाई संगीत विद्यालय, अन्नछत्र योजना इत्यादी उपक्रम राबवून, मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम घडवून आणण्यात पुढाकार घेतला आहे. देवळामध्ये दर्शनीभागात आवाहन लिहिलेले आहे, की भक्तांनी वेतोबाचा नवस फेडताना, प्रत्येकाने चपलाचा जोड न देता, त्यासाठी लागणारी रक्कम, साधारणपणे दोन हजार (२०००/-) रुपये संस्थेला (ट्रस्ट) दान करावी. त्या दानातून देवाला दर महिन्याला एक नवीन जोड देण्यात येईल. बाकी रक्कम साठवण्यात येईल. त्या निधीतून नियोजित चांदीच्या चपला बनवण्यात येतील व उरलेल्या दानधर्मातून विधायक काम करता येतील. असे पंचवीस लाख रुपये जमा करण्याचा मानस असून अर्धीअधिक रक्कम जमाही झाली आहे. ही डोळस श्रद्धा स्तुत्य व अनुकरणीय आहे.
चतुरस्र लेखक जयवंत दळवी हे आरवलीचे. त्यांच्या साहित्यातून ‘देव वेतोबा’ प्रथम भेटला. त्याचे प्रत्यक्ष दर्शनही आनंददायक आहे. तेथून एक किलोमीटरवर असलेला शिरोडा गावही सुंदर आहे. विशेषत: तेथील समुद्र किनारा आणि तेथे ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित झालेले, पद्मभूषण वि.स. खांडेकर हे तब्बल अठरा वर्षे तेथील शाळेत शिक्षक म्हणून वास्तव्यास होते. ते आरवलीच्या ‘भिके डोमगरी’ ह्या टेकडीवर तासन् तास बसत असत. त्यांनी समोरचा सुंदर समुद्र किनारा आणि आसपासचा मनोहर आसमंत न्याहळत चिंतन केले असेल. ते तेथील ज्या दगडावर बसत त्याला ‘खांडेकर खूर्ची’ असे नाव देण्यात आले आहे. साहित्यप्रेमी आणि स्थानिक जनता यांच्यासाठी ते स्थळ आदरस्थान बनले आहे. त्‍या सर्व परिसराला भेट देऊन मन प्रफुल्लित होते. सोबत कोकणवासियांची श्रद्धाही मनाला भावते.
आजगाव हा संस्कृतोद्भव शब्द आहे. अजगवम्, अजगाव, आजगावम् या तिन्ही शब्दांचा अर्थ आहे शिवधनुष्य! अज म्हणजे ज्याला जन्म नाही असा म्हणजे शंकर! आजगाव ह्या नावावरूनही त्या गावचे अलौकीकत्व समजून येते.
- ज्योती शेट्ये
https://www.thinkmaharashtra.com
🙏🏻जय भगवान रविदासजी 🙏🏻












AUTHOR.......
MR. ASHOK VETAL


 चित्रकार -  लेखक - मुख्याध्यापक

श्री. अशोक वेताळ 

8 comments:

  1. श्री परब सर.. अतिशय उत्कृष्ट लेख

    मनःपूर्वक शुभेच्छा !!!

    ReplyDelete
  2. वेताळ सर । परब सर तुम्हा दोघांचं हार्दिक अभिनंदन । अशीच प्रगती होत राहो।

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद!! कृपया कमेन्ट खाली आपले नाव लिहावे!!! पुनश्च मनःपूर्वक आभार ..

      Delete
  3. कोरोनाची सांगड पूर्वापार चालत आलेल्या काही रूढी,परंपरेशी घातली आहे ,छान आहे ,परंतु त्यातील काही गोष्टींनाच शास्रोक्त कारणे आहेत,सर्वच पूर्वीच्या प्रथा योग्यच होत्या असे नाही,काही अंधश्रद्धही होत्या.पण आपण मांडलेले विचार छान,अभिनंदन वेताळ सर आणि परब सर,स्तुत्य उपक्रम,खूप शुभेच्छा
    मीनल भोळे
    घाटकोपर,मुंबई

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप मनापासुन आभार मीनल भोळे मॅडम

      Delete
    2. धन्यवाद मीनल भोळे मॅडम!!

      Delete
  4. सुनील पवार सर फारच सुंदर व आजच्या घडीला समर्पक शब्दात वर्णन आहे. आपणास भावी वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा. अतिउत्तम कविता.

    ReplyDelete

CREATIVE E BOOK.COM

POPULAR POSTS