तुमच्यातील कवी, लेखक जागृत करूया.......श्री. अशोक वेताळ
शैक्षणिक,धार्मिक,सांस्कृतिक,सामाजिक प्रबोधन विषयक पुस्तक लेख कविता या शैक्षणिक ब्लोग वर शेअर करा.या शैक्षणिक ब्लोग चा उपयोग विदयार्थी,पालक, शिक्षक व समाजातील प्रत्येक घटकाला होईल अशी मी अशा बाळगतो. धन्यवाद !!!
Mrs. Sneha Kamlesh Kesarkar
ती ...आणि फक्त तीच...
रिमझिम पाऊस... थंडगार वारा... टप टप पडणारे पाण्याचे थेंब... बेधुंद पणे वाहणाऱ्या, बनवलेल्या कागदाच्या बोटी... आणि प्रत्येक बोटीवर प्रत्येकाने स्वछंदपणे लिहिलेले ध्येयाचे ठिकाण...
त्या बोटीत बसून जणूकाही उंच स्वप्नांची भरारी घ्यावी... आणि त्या ठिकाणी आपली बोट सुरळीत पोचावी, ह्या आशेवर आनंदाने पाण्यात मुले बोट सोडत होती... पण त्या मुलांमध्ये एक ' ती' होती की, तिला काहीच स्वप्न नव्हती.... तिने स्वतःचा बोटीवर कुठलेचं ध्येयाच्या ठिकाणाचे नाव लिहिले नव्हते.....
(आपण सर्वजण एकविसाव्या शतकात... म्हणजेच कलियुगात वावरतो. ह्या युगात आपण खूप सारे बदल घडवून आणले. आधुनिक तंत्राशी मैत्री केली, जात- भेद, समानता .... अशा सगळ्या गोष्टी आपण आत्मसात केल्या. मग चला तर बघूयात "ती" ही तीच ....का राहिली????)
अमावस्या ची रात्र होती... सुमनला जोराच्या प्रसुती कळा सुरू झाल्या... अमावस्या संपायला अजून खूप अवकाश होता. सुमन ची सासू... तशी बर्यापैकी शिकलेली- सवरलेली होती. सासुबाई म्हणाल्या, " अगं सुमन अजून थोड्या कळा सहन कर बाई!! अमावस्या संपायला खूप वेळ आहे. अमावस्या मध्ये बाईची प्रसूती होणे चांगले नाही.अमावस्या संपली की जाऊयात इस्पितळा मध्ये .... तोपर्यंत जरा कळा सहन कर गं !!!" ( इथे सुमनची तब्येत ढासळत चालली होती आणि सासूबाई धीर धर ग बाई करत बसल्या होत्या....) शेवटी काय सुमनला तिच्या घरच्यांनी इस्पितळामध्ये नेलेच नाही.... सुमनने दम टाकत- टाकत तिची प्रसुती त्यांनी घरीच केली. आणि बरं का?? अमावस्या अजून संपायला तीन ते चार तास बाकी होते, त्या आधीच सुमने ' ती ' ला जन्म दिला. '
ती ' आली ....छोटी नाजूक पावले, गोड हसरा चेहरा, निरागस भाव.... पाहून सुमनला खूप आनंद झाला. तिच्या घरच्यांना आनंद झाला होता... पण चेहर्यावर फारसा दिसत नव्हता. सुमनच्या नवऱ्याची घरची परिस्थिती खूप चांगली होती. लोकांचे तोंड गोड करायचे म्हणून... कंजुषी करत-करत पेढे वाटले. पण.. 'ती ' च्या येण्याने सुमन मात्र जाम खुश झाली होती. ' ती ' आल्यावर एक वेगळेच चैतन्य घरात वाटत होते. आनंदाने खेळू- बागडू लागली. सुमन ' ती ' मध्ये खूप रमून गेली होती. पण.. सुमन ची इच्छा नव्हती, तरी सुद्धा ' तो ' साठी प्रयत्न करावा लागला... आणि परत एकदा सुमनला दिवस गेले.
पाळणा हलला... ह्या वेळी सुमनला " वंशाचा दिवा " कायम जपणारा मुलगा झाला. आता... घर अगदी आनंदाने डोईजड झाले होते. हत्तीवरून साखर वाटावी, असे थाटात सगळ्यांना सांगत सुटले होते की, " वंशाचा दिवा " जन्माला आला आहे. सुमन चा नवरा व तिचे घरचे यांना आनंद गगनात मावेनासा झाला होता.पण... एका कोपऱ्यात ' ती ' उभी राहून सर्व काही बघत होती... ह्या गोष्टीचा आनंद की अजून काही करावं काहीच कळत नव्हते....
काही काळ लोटला... ' ती ' मोठी झाली आणि " वंशाचा दिवा " सुद्धा.. दोघांमधले म्हणायला जरी समान हक्क असले तरी... घरामध्ये दिव्याला जास्त महत्त्व दयायचे, सतत घरामध्ये पेटत राहिला पाहिजे... " समई " काय फक्त सणासुदीला वापरायची नंतर परत बांधून अडगळीत टाकून दयायची. आदर ,कौतुक, प्रेम तसेच मायेने पाठीवरून कधीच ' ती 'च्या फिरवला गेला नाही... सगळ्यात हुशार, सतत जळणारी ... घरासाठी उजेड देत असणारी ' ती '.... दिव्याची वातच कायम चांगली म्हणत... हळूच ' ती ' ची वात काढून फेकून दयायचे... चांगले शिक्षण घेऊन.. मेहनत करून स्वतःचे नोकरीत स्थान मिळवले, पण... तेथेही नोकरीत पुढे जाण्याकरिता ' ती ' लाच घाणेरड्या वृत्तीची अपेक्षा ठेवू लागले... तरचं तुला पुढे जाता येईल, असे सांगण्यात आले.... किंवा सर्वांसमोर 'ती ' ला कमी लेखणे , चुकीची वागणूक दिली जाते....का ???? नाही ' ती ' ला स्वतःच्या बळावर उभे केले जात नाही... का ???? नाही ' ती ' च्या कर्तृत्वावर कौतुक केले जात.... नेहमीच ' ती ' ला चूकीच्या अर्थाने गालबोटे लावून अपमानास्पद मान खाली घालायला लावायची......
( मित्रांनो... कलियुगात आपण येऊन ' ती ' ला शिकवले... पण तिच्यातल्या भावना, आस , धैर्य... कुठे हरवलयं)
ह्या सर्व गोष्टीमुळे ' ती ' ला स्वतःचा confidence हरवू लागली... Phschlogically ' ती ' प्रत्येक गोष्टीत मागे पडू लागली. सततची कानटोचणी, अपरिहार्य शब्द... ऐकून कान विटाळ झाले होते. खरंतर सुमनला खूप काही गोष्टी ' ती' वर होणार्या जाचक वृत्ती पटत नव्हत्या. सगळ्यांच्या विरोधात जाऊन ' ती 'ला साथ दयायची ठरवले. पण... ठरवून सुद्धा हतबल झाल्यासारखे काहीच मार्ग सापडत नव्हता. चालता- चालता रस्त्यावरून आपण स्वतःला हरवून बसलोय की काय असे वाटू लागले.
' ती ' च्या मनाविरुद्ध... नवऱ्या मुलाची काहीही चौकशी न करता छान थाटा-माटात लग्न लावून दिले. नातेवाईक मित्रमंडळी बरीच मंडळी लग्नाला उपस्थित होती. पण... ' ती ' मात्र नि:शब्द पणे लग्नाला उभी होती. आज ना उद्या ' ती ' ला सासरी जायचं आहे ना... मग आज का नको... असे, घरचे म्हणत ' ती 'चे लग्न लावून दिले. नवरा मुलगा दिसायला सुंदर आणि नामांकित कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत होता. शिक्षण, पैसा, प्रतिष्ठा सर्व काही होत. ' ती ' तिला थोडी आशा होती की, सासरी आल्यावर नवऱ्याकडून चांगली वागणूक मिळेल. ' ती ' चे शिक्षण खूप चांगले झाले होते. तसेच इतर कला विषयीचे तिचे ज्ञान उत्तम शिकण्याजोगे होते. ' ती ' चे ज्ञान चांगल्या कार्य ... कामांमध्ये वापरता येईल म्हणून नवऱ्याकडे विनंती केली. मला काहीतरी काम करायचे आहे असे सांगितले. पण... कोणीही ' ती ' ला प्रतिसाद देत नव्हता.....
संध्याकाळचे सहा वाजले होते ' ती ' चा नवरा वैतागत घरी आला. त्याच्या चेहऱ्यावर खूप नैराश्य, भीती... त्याची मनस्थिती हेलकावून टाकणारी झाली होती, त्याचे बोलणे खूप भीतीदायक वाटू लागले होते. कसेबसे ' ती ' ने त्याला समजावून शांत केले. ' ती ' घरात सगळ्यांना समजून, सांभाळणारी, काळजीतून जबाबदारी स्वीकारणारी होती. कालच्या सर्व प्रकारातून ' ती 'ला एक धक्कादायक घटना ' ती ' च्या आयुष्यात घडली.... नवऱ्याने ' ती ' ला आपल्या बॉस बरोबर एक रात्र घालवण्याची बळजबरी केली, कारण.. असे केले तर त्याला नोकरीत प्रमोशन, उत्तम पगार वाढवून मिळेल. मग त्याचे स्वप्न पूर्ण होणार.. नाही केले तर नोकरी जाईल.. आपण सगळे रस्त्यावर येऊ... असे सांगण्यात आले.
या नराधमाला थोडा पण ' ती ' बद्दल साठी आदर, प्रेम आपुलकीपणाचा विचार मनात सुद्धा आला नाही. नवऱ्याच्या Status , prestige... पुढे तिला काहीच बोलता आले नाही. पुन्हा एकदा ' ती ' बळी पडते....
काही वर्षातच ' ती ' चा नवरा तिला घटस्फोट देऊन सोडून देतो. स्वतःला कशीबशी सावरणार... स्वतःच्या पायावर उभंआयुष्य राहण्याचा प्रयत्न करणारी ' ती ' लालची ,फसवणूक , बेपर्वा वृत्ती, बुरसटलेल्या समाजात तिला उकिरड्यावर फेकून देतात.... ' ती ' चा जन्म फक्त सोसणे ,सहन करणे, दुःख, टाकून बोलणे, इच्छेला मुरड घालणे.... चांगले शिक्षण घेऊन तरी काय करायचे, ' ती ' च्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून त्यावर हसायचे. अशा परिस्थितीत ' ती ' ला जगणे असह्य होत गेले... आणि ' ती ' ने शेवटी स्वतःला या जगातून मुक्त करण्याचा निरोप घेतला.... जगण्याला आणि स्वप्नांना , इच्छेला राम उरला नाही. सततचे आघात.. दुःख नाही सोसता येत....
म्हणून ' ती ' ने आपली बोट रिकामीच ठेवली होती.... ' ती ' चे कुठलेच ध्येय नव्हते. तिला माहित झाले होते.... आपण आपल्या ध्येयापर्यंत कधीच पोचू शकणार नाही आणि कोणी पाठविणार ही नाही.... सहनशीलता, अपराध, वेदना, बळजबरी ह्या फक्त ' ती ' आणि तिलाच केल्या जातात....... मग ध्येयाच्या किनाऱ्यावर बोट कशी पाठवणार..........
( कथेतून तुम्हाला कळलेच असेल.... ' ती ' चा जन्मापासून ते मरेपर्यंत सगळ्याच गोष्टींमध्ये या भ्रमिष्ट समाजामध्ये कुठलेही मान - सन्मान ,कौतुक, आदर्श , इच्छा विचारात घेतल्या जात नाही... ' ती ' ही कुठल्याही वयाची असो पण तिच्यावर अन्याय मात्र होतच राहिला... म्हणायला आजच्या या modern जगात.... आम्ही खूप काही बदले आहे, म्हणणारे ' ती ' चा वापर करून तिला सतत,विंवचन, हालपेष्टा, मारहाण करत असतात... ' ती ' आणि फक्त 'तीच ' या सर्वांना बळी पडत असते....कधी स्वतंत्रता... मुक्तता मिळणार आहे... ' ती ' वर्गाला... मान वर करून स्वतःचे अस्तित्व जपायला... स्वच्छंदपणे मोकळ्या आकाशात श्वास घ्यायला... याचा सर्वांनी विचार केला पाहिजे.......)
लेेेेेेखिका -सौ. स्नेहा कमलेश केसरकर
(Mrs. Sneha Kamlesh Kesarkar)
....हरवलेली माझी आई......
हरवलेली माझी आई ह्या जगात मला परत सापडेल का ???
सतत हसत - खेळत राहून... स्वतःच्या अगोदर नेहमीच दुसऱ्यांचा विचार करणारी... माझी आई...
कितीही तुला दुःख असले तरी , स्वतःचे दुःख बाजूला ठेवून, दुसऱ्यांना आनंदाने जाऊन मदत करणारी ही माझी आई... मला परत सापडेल का???
मला आयुष्यात खूप मोठे करता- करता... तू... तुझ्यातले आयुष्य हरवून, अपार कष्ट केलेस... आणि माझ्या आयुष्यासाठी लढत- लढत राहिलीस... कोणी सांगेल का?? अशी हरवलेली आई पुन्हा मला सापडेल का???
कुठेतरी माझे आयुष्य हे सुरळीत चालू होताच... आयुष्याच्या एका वळणावरती, मी नव्याने सुरुवात करणार... त्याचवेळी तु माझ्या आयुष्यातून हरवून गेलीस...
प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणाला... माझ्या सुंदर नव्या आयुष्यामध्ये मी तुला सतत शोधत गेली... कुठेतरी आस होती... एक दिवस तरी तू मला परत भेटशील.....
हरवलेली माझी आई मला पुन्हा सापडेल का????
तुझ्या नातवंडांना मी नेहमीच तुझी आठवण करून देताना माझ्या काळजाला रडू यायचे....
हरवलेली माझी आई व तुमची आजी पुन्हा आपल्याला सापडेल का????
पण.. नशीब आणि देवापुढे कोणाचेही चालत नाही, देवाला जशी हसणारी फुले आवडतात.... तशीच माझी फुलासारखी आई देवाला आवडली आणि तो तिला त्याच्या घरी घेऊन गेला........
ती कधीच माझ्या आयुष्यात न परतण्यासाठी......
शेवटी काळजावर दगड ठेवून मनाला समजावले... आई.. आई अशी हाक आता मला कधीच मारता येणार नाही... ती माझ्या आयुष्यातून हरवून गेली ...
हरवलेली माझी आई ...मला पुन्हा माझ्या आयुष्यात दिसायला आणि जगायला मिळणार नाही.....
पण... देवा!! तुला एकच प्रार्थना करू इच्छिते की, माझी आई... जिथे कुठे असेल, तिथे तिला सुखी व आनंदी ठेव .
-----------------------------------------------------------------------------------
लेखक, कवी, चित्रकार व कलाशिक्षक
श्री. रावसाहेब ससाणे
SHRI. RAOSAHEB SASANE
लेखक श्री. रावसाहेब ससाणे यांचे
संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇👇👇👇👇
https://wetransfer.com/downloads/0a68226706d981a700726b8aef59c2ee20200407173820/336bebc417c0ca86fb3e0fcbf8b0b47f20200407173846/c6c85f
आजच्या विद्यार्थ्यांना शिस्त का लागत नाही????
लेखक
श्री. सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक
*विद्यार्थ्यांना शिस्त का लागत नाही?*
*उत्तर*===
शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्र मधील लेख.
विद्यार्थ्यांना घडवण्यात शिक्षकांची मोठी भूमिका असते. काळानुसार या भूमिका बदलत जातात. भूमिका जशा शिक्षकांच्या बदलत जातात तशा पालकांच्या सुद्धा. *ब-याच वेळा शिक्षक- पालक यांच्या नात्यावर विद्यार्थ्यांची प्रगती अवलंबून असते.*
५० वर्षांपूर्वी गुरुजी विद्यार्थ्यांवर मेहनत घ्यायचे. विद्यार्थ्यांना झोडपले, मारले तरी पालक शिक्षकांना काही बोलायचे नाहीत उलट विद्यार्थी आई - वडिलांना सांगायचे नाही की आज शाळेत मला शिक्षा झाली किंवा मला मारले कारण वडिलांचा अजून मार बसायचा. तुला शिक्षा झाली म्हणजे तू चुकलाच असेल ही धारणा पक्की होती. याचा परिणाम असा झाला होता की शिक्षकांबद्दल भीतीयुक्त आदर होता. *शिक्षक हेच सुधारण्याचे प्रवेशद्वार यावर पालकांची श्रद्धा होती.* त्या काळात शिक्षक ही तसेच होते . *अशा शिक्षकांमुळे आपण सारे घडलो.* आयुष्यात येणाऱ्या समस्या या आपल्यालाच म्हणजे स्वतःला सोडवायच्या असतात. आपले आई-वडील शाळेत येऊन शिक्षकांशी बोलणार नाही, समस्या सोडवणार नाही. . यामुळे नियमबाह्य कामच करू नका. . *चुकीचे गैरवर्तन करू नका. हे शिक्षकांच्या धाकामुळे शक्य झाले* जे पुढे आयुष्यात नोकरी-व्यवसाय करताना खूप उपयोगी पडले.
*शाळेतील नियम पाळल्यामुळे ऑफिसमध्ये वेळेवर जाण्याची सवय लागली.*
*आजकालचे पालक विद्यार्थ्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये नाक खुपसून शिक्षकांशी चर्चा (वाद) करायला येतात* आणि ही चर्चा चालते त्या मुलांदेखत. जिथे मुलांच्या मनाला समजते की आई-वडील हे आपल्या प्रत्येक समस्या सोडवतील (समस्या या समस्या नसून बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचे गैरवर्तन असते पण ते त्याला कधीच मान्य नसते.) *आई-वडील आपल्या वर्तणुकीला सपोर्ट करता बघून त्यांचे सुधारण्याचे मार्ग हळूहळू कमी होत जातात.* हे त्या मुलाला समजत नसते किंबहुना हे समजण्याचे वयच नसते पण पालकांना समजत असते. मात्र आंधळया प्रेमापोटी ते समजण्याच्या मनस्थितीत नसतात.
50 वर्षांपूर्वीचे शिक्षक हे खरे गुरुजी होते. त्यानंतर गुरुजी हळूहळू कमी होत त्यांच्यातले उरलें कडक शिक्षक. .
*या कडक शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. याचा परिणाम अतिसंवेदनशील विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होऊ लागला.*
1990 नंतरच्या म्हणजेच पंचवीस तीस वर्षांपूर्वीचे शिक्षक होते त्यांच्याकडून अति कडक शिस्त आणि शिक्षा यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान काही प्रमाणात सुरू झाले.
याच दरम्यान ग्लोबलायझेशन नुकतेच आले होते. पालकांची मानसिकता बदलत होती.. *भौतिकवादाकडे आपण चालायला सुरुवात झाली आणि अतिमहत्त्वकांक्षा, हव्यास अशी चुकीची मूल्ये समाजात रुजायला लागली.*
पास-नापास यांचा गंभीर प्रश्न समाजासमोर यायला लागला. नैराश्यातून दहावीच्या विद्यार्थ्यांचे आत्महत्या प्रमाण वाढले. *"शालेय परीक्षेत नापास म्हणजे आयुष्यात नापास", या एका विचारामुळे विद्यार्थ्यांंमध्ये नैराश्य वाढत गेले.*
याच दरम्यान शिक्षणाचा कायदा आला. यामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारणे, शिक्षा करणे हा गुन्हा ठरवला. आठवीपर्यंत नापास करता येणार नाही अशा तरतुदी आल्या यामुळे कडक शिक्षकांच्या मानसिकतेमध्ये हळूहळू बदल झाला. बरेच शिक्षक रिटायरमेंट स्टेजलाच होते. 2001 नंतर शिक्षकांची नवी तरुण पिढी यायला लागली. पण या दरम्यान पालकांच्या मानसिकतेमध्ये फार बदल झाला होता. येत्या दहा वर्षांमध्ये भौतिकवाद समाजात प्रचंड रुजला. *जिंकणे हेच सर्वस्व मग भले ते कुठल्याही मार्गाने मिळो हा संस्कार पालकांमध्ये घट्ट रुजला आणि त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर झाला.* पालकांमध्ये आपल्या मुलाबद्दल अति महत्त्वाकांक्षा निर्माण झाल्या. एकुलते एक बाळ. . त्याला हव्या त्या गोष्टी पुरवणे. . त्यांची प्रत्येक मागणी पूर्ण करणे.. हे पालकांचे आद्य कर्तव्य झाले. याच दरम्यान पालक आणि विद्यार्थी सोशल मीडिया, मोबाईल, टीव्ही या सर्व गोष्टीत अडकले. *मैदानी खेळ नाही, अति स्क्रीन टाइम यातून मुलं हट्टी बनत गेली. मागितले तर मिळते हा संस्कार अधिक रुजला.* *चंगळवादामुळे पालकांमध्ये मूल्य-संस्कार याचे महत्व कमी झाले. याचा महत्त्वाचा परिणाम शिक्षकांबद्दलचा सन्मान कमी झाला.* प्रत्येक गोष्ट पैशाने विकत घेतली जाते अशा खोट्या समजुतीमुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान व्हायला सुरुवात झाली. *अति लाडा मुळे म्हणा किंवा अतिमहत्त्वाकांक्षी पणामुळे म्हणा किंवा शिक्षण कायद्याचा गैरवापर म्हणा पालक छोट्या-छोट्या कारणांसाठी शिक्षकांशी वाद घालू लागले.*
आईने मुलाच्या संपूर्ण अभ्यासाची जबाबदारी स्वीकारली. १०० पैकी १०० मार्कांसाठी मुलांच्या अभ्यासाच्या चुकांपासून शिक्षकांच्या चुका काढण्यापर्यंत सर्व ती करू लागली. *पालकांच्या व्हाट्सअप ग्रुप वर फक्त शिक्षक कसे चुकीचे होते आणि माझी मुलगी/ मुलगा कसा योग्य आहे आणि तो/ती कधीच खोटे बोलत नाही यावरच चर्चा रंगू लागल्या.* *येत्या १० वर्षातील शिक्षकांना वर्गामध्ये क्लास कंट्रोल करणे कठीण होऊ लागले. ADHD, Learning Disabilities, Lack of Concentration यासारख्या समस्यांचे प्रमाण वाढले.* वर्गातील दोन-तीन टग्या मुलांमुळे अख्खा वर्ग डिस्टर्ब होऊ लागला. त्यात हायपरऍक्टिव्ह मुलांच्या समस्या वेगळ्याच होत्या. *त्या हाताळायच्या कशा हा शिक्षकांसमोर प्रश्न पडला.*
शिक्षण कायद्याच्या गैरवापरामुळे विद्यार्थ्यांना मारणे सोडा साधे रागावणे कठीण होऊन बसले. *शिस्त लावण्यासाठी शिक्षा द्यावी तर काय द्यावी हा प्रश्न पडला. वर्गाच्या बाहेर काढले तर पालक भांडायला येतात की तो/ती वर्गाच्या बाहेर राहिल्याने तिचे शैक्षणिक नुकसान झाले. वर्गात उभे केले तर पालक ओरडतात की त्याच्या मानसिकतेवर परिणाम झाला, आता तो शाळेत यायला नाही म्हणतो.
कान पकडून उठाबशा काढायला सांगितले तर पालक दुसऱ्या दिवशी मेडिकल सर्टिफिकेट घेऊन येतात.
खूप त्रास देतो म्हणून कुठल्या ऍक्टिव्हिटी मधून काढून टाकले तर लगेच पालक म्हणतात आम्ही फी भरली आहे त्याला ॲक्टिव्हिटीमध्ये घ्या.* तशी स्कूल डायरी मध्ये नोट्स येते. टीचरने त्याच्याशी बोलणे सोडले तर पालक लगेच म्हणतात पाहू टीचर किती दिवस बोलत नाही तुझ्याशी. . तू स्वतःहून बोलू नकोस. . प्रिन्सिपल ला सांगून तिला तुझ्याशी बोलायला मी भागच पाडते.. अशी कशी टीचर बोलत नाही पाहू.
*म्हणजे मुलांना शिस्त लावण्यासाठी शिक्षा द्यायचीच नाही पण शिस्तीची अपेक्षा शाळेकडून नेहमी ठेवायची.* विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य मिळत असेल तर त्याबरोबर कर्तव्य सुद्धा पूर्ण करायचे असतात, जबाबदारीसुद्धा पाळायची असते याचा संस्कारच आजकालच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजत नाही. *शिक्षक हे सुधारण्याचे प्रवेशद्वार असते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रेम आणि स्वातंत्र्य देऊन त्यांची मनं जिंकायची असतात पण हे करण्याच्या प्रक्रियेमध्ये शिस्त लावण्यासाठी काही अधिकार शिक्षकांना सुद्धा लागतात.* *मारणे, जबर शिक्षा करणे हे अघोरीच आहे ते केव्हाच कालबाह्य झाले आहे आणि आजकालचे शिक्षक याचे समर्थनपण करणार नाहीत पण सध्याच्या काळात साधे रागावणे, विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी छोट्या-छोट्या शिक्षा करणे सुद्धा पालकांच्या दबावापोटी बंद झाले आहे. याचा विद्यार्थ्यांवर दूरगामी खूप वाईट परिणाम होतो.* विद्यार्थ्यांना अपमान पचवण्याचे मानसिक धैर्य राहत नाही. असे विद्यार्थी तरुणपणी लवकरच नैराश्याच्या विहिरीत पडतात. मला कोणी रागवत असेल तर ते माझ्या फायद्यासाठी आहे. . कुणीही शिक्षक आनंदासाठी, काट काढण्यासाठी, दुसऱ्याचा राग विद्यार्थ्यांवर काढण्यासाठी विद्यार्थ्याला रागवत नसतात. ते रागवतात याचा सरळ अर्थ विद्यार्थी कुठेतरी चुकतो आहे पण विद्यार्थ्यांची धारणा होऊन जाते की मला कोणीही रागवू नये ओरडू नये. या धारणेने विद्यार्थी मोठा होतो आणि मग पुढे आयुष्यात वावरताना नोकरी करताना व्यवसायामध्ये, समाजात लोकांशी वागतांना जड जाते. कारण जग आपल्या म्हणण्यानुसार नाही चालत. *आयुष्यात मान-अपमान हे दोन्ही येत राहते. मारणं हे अयोग्यच त्याला मी काय कोणीही समर्थन करणार नाही पण वर्गात रागावणं सुद्धा आजकाल बंद झाले आहे त्यामुळे अपमान कसा सहन करावा आणि त्यातून self analysis कसे करावे ही प्रक्रियाच मुलांच्या मनांत होत नाही. जी सर्वंगीण विकासासाठी आवश्यक आहे.*
काही झाले की पालक शिक्षकांशी चर्चा करायला येतात ज्यामध्ये चर्चेचा सूर कमी आणि कोर्टात जसे आरोपीला प्रश्न विचारतात तसेच पालक शिक्षकांना विचारतात. या सर्व संवादामुळे मुलांच्या मनात शिक्षकांविषयीचा आदर निघून जातो आणि विद्यार्थी हेच शिकतो की मला काही अडचण आली तर आहे माझी आई. त्याच्या प्रत्येक (चुकीच्या) निर्णयांमध्ये आई सहभागी होते. ती स्वतः निर्णय घेते. . *ती इतकी involve होते की त्याचा अपूर्ण राहिलेला होमवर्क, प्रोजेक्ट, अभ्यास ती स्वतः पूर्ण करते. पाल्य दुसऱ्यांवर अवलंबून राहायला शिकतो.* स्वावलंबनाचे धडे लहानपणी द्यायचे असतात ते ती विसरून जाते. *ही मुलं मोठी झाली आणि घरात आग लागली तरी फायर ब्रिगेडला फोन करायचा असतो हे सुद्धा त्यांना लवकर सुचत नाही एवढे ठोम्बे बनतात कारण लहानपणापासून मुलांसाठी आपण Ready made answer देत होतो.*
जिथे पालक शिक्षकांशी उद्धटपणे वागतात तिथे विद्यार्थ्यांची प्रगती खुंटते. मानसशास्त्राचा नियम आहे. . *जेव्हा विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांबद्दल आदर असतो, श्रद्धा असते तेव्हा शिक्षक जेव्हा वर्गात शिकवतात तेव्हा अंतर्मनाची द्वारे आपोआप उघडली जातात* आणि शिक्षक जे शिकवतात ते लक्षात राहण्याची शक्यता अधिक असते. जेव्हा पालक विद्यार्थ्यांसमोर त्यांच्या वर्ग शिक्षकांशी उद्धटपणे बोलतात किंवा सातत्याने भेटून तक्रारीचा पाढाच गात राहतात तिथे पाल्याच्या मनातील शिक्षकांबद्दलचा आदर कमी होत जातो आणि त्याचे शैक्षणिक समस्याचे प्रमाण वाढत जाते.
काही पालक खास करून आया आपल्या बद्दल नेहमी असमाधानी असतात. *पालकत्वाची A B C D सुद्धा माहित नसलेल्या या आया शिक्षकांसमोर माझं मूल कसं मूर्ख आहे, त्याला कसं कळत नाही आणि या सर्वाला एकमेव टिचरस कसे जबाबदार आहे हे मोठ मोठ्या आवाजात दहा पालकांसमोर बडबडत असतात.* अशा पालकांच्या पाल्याचे भविष्याबद्दल खरच चिंता वाटते कारण असे पालक समजून घेण्याच्या पलीकडचे असतात. काही पालक तर मुख्याध्यापकांकडे हट्ट धरतात की शिक्षकांना बोलवा आणि माफी मागायला लावा. यातून टीचेर्सचे मनोधैर्य कमी होते. ते शाळेतील एक्स्ट्रा कामे करायला कंटाळा करतात. *शिक्षकांकडून उत्तम कामाची अपेक्षा असेल तर त्याचे कौतुक होणेही गरजेचे असते* खास करून ज्या शाळा फक्त अभ्यास शिकवण्याचे कार्य करत नसून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याची धडपड करत असतात आणि त्यासाठी सातत्याने नवनवीन अॅक्टिविटीचे आयोजन करत असतात. अशा ऍक्टिव्हिटी घेण्यासाठी मुख्याध्यापकांना उत्तम नियोजनाबरोबर शिक्षकांचे सहकार्य अपेक्षित असते. हे सहकार्य हळूहळू कमी होते.
या काही कुरकुरे पालकांमुळे शिक्षकांचा उत्साह कमी होतो. प्रत्येक शाळेत असे कुरकुरे पालक असतात त्याचे प्रमाण दहा टक्के पण नसते पण त्यांच्या चुकीच्या संवादामुळे, चुकीच्या पालकत्वामुळे, चुकीच्या अपेक्षेमुळे शाळा व्यवस्थापनाशी वाद होतात. 90% पालक हे शाळेबद्दल नेहमी आनंदी असतात पण ते बघ्याची भूमिका घेतात. शिक्षकांना कौतुक करण्यात ते कंजुषी करतात आणि मग हे 10% पालक अतिशय उद्धटपणे विषय हाताळतात. सोशल मीडिया, वृत्तपत्र यांना चुकीच्या माहिती देऊन बातम्या प्रसिद्ध करतात. व्यक्ती/संस्था जेवढी मोठी तेवढ्या तिखट-मीठ लावून बातम्या रंगवल्या जातात.. या सर्वांची सुरुवात झालेली असते ती म्हणजे अतिमहत्त्वाकांक्षा अति अपेक्षा चुकीच्या पालकत्वाच्या या बीजातून.
कालच बातमी वाचली नाशिकमध्ये एक पाचवीचा विद्यार्थी दोन दिवस शाळेत आला नाही म्हणून शिक्षकाने आईला फोन करून सांगितले. आई म्हणे तो रोज शाळेत जातोय. आईने मुलाला विचारले, तेव्हा तो कबूल झाला मी शाळेत जातो सांगून घरातून निघतो पण शाळेत जातचं नाही. तो वाईट मुलांच्या संगतीत लागला होता. म्हणून आईने त्याला दोन फटके दिले. आईने मारले याचा राग आला म्हणून त्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. आता या घटनेला कोण जबाबदार? शिक्षक.. ज्याने काळजीपोटी मुलगा शाळेत येत नाही म्हणून फोन केला का आईने त्याला पहिल्यांदाच मारले का तो स्वतः विद्यार्थी ज्याला राग सहन होत नव्हता. आईने आधीपासूनच शिस्तीला महत्त्व दिले असते, चुकले की रागवले असते, *शाळेचे नियम हे भविष्य चांगले करण्यासाठीच असतात* हे जर पहिलीपासून मनावर बिंबवले असते तर आज ही वेळ कदाचित आली नसती.
*पालकांनो शिस्त ही प्रेमाची पहिली पायरी आहे.* शिक्षकांना त्यांची कामे करू द्या. *शाळेचे छोटे छोटे नियम पाळावेच लागतात कारण त्यातून मोठेपणी भारतातील कायदे पाळण्याचे संस्कार रुजत असतात.* शाळेत थोड्या उशिरा पोहोचल्याने त्यांच्यामध्ये वेळेचे व्यवस्थापनाचे महत्व कमी होते याचे साधे ज्ञानसुद्धा आजकाल पालकांना नसते. आजकालची मुलं अति लाडा पोटी बिघडत चालली आहे त्यांना कोणाचीच भीती उरली नाही. त्यांची वाढ अशीच झाली तर पुढे ते आई-वडिलांची झोप उडवू शकतात म्हणून शाळा शिक्षक आणि पालक यांच्यात मैत्रीपूर्ण वातावरण असणे गरजेचे आहे. शाळेत होणाऱ्या ओपन हाऊस, पालकांच्या मिटींगला शिक्षकांशी सन्मानांनी बोलणे, त्यांना समजून घेणे हे तेवढेच महत्त्वाचे आहे. एकमेकांना आदर आणि सन्मान जर राहिला तर त्या विद्यार्थ्यांना योग्य रुळावर आणणे सोपे जाईल.
*जिथे शिक्षकांचा सन्मान होत नाही तिथे समाजाची प्रगती खुंटते आणि देशाचे नुकसान होते.*
*सचिन उषा विलास जोशी*
शिक्षण अभ्यासक
..... 🎨 *चित्रकला शिक्षक* 🎨....*उत्तर*===

चित्रकला शिक्षक हा किमयागार असतो. अध्यापनाच्या तासांना श्रवणभक्ती आणि डोकीफोड करुन कंटाळलेल्या मुलांना, चित्रकलेचा तास सुगंधी वा-याची शीतल झुळूक वाटते. वर्गातला ब्लैक एंड व्हाईट माहौल सरुन चित्रकलेच्या तासाला वर्गात सप्तरंगी इंद्रधनुष्य प्रकटते. मुलं त्या रंगात न्हाऊन निघतात. उपवनातील रंगीबेरंगी फुलांसारखी ती सुंदर दिसतात.
फलकलेखन सर्वच विषयाचे शिक्षक करीत असतात. परंतु चित्रकलेच्या शिक्षकांचं फलकलेखन, मुलांना अतिशय प्रिय असते. कारण एरवी मूक असलेला काळा कुरुप फळा, चित्रकलेच्या तासाला मुलांशी चक्क बोलू लागतो. आणि सुंदरही दिसतो. त्याला दृष्ट लागावी इतकी मुलं त्याकडे टक लावून पाहत असतात.
अन्य विषयाच्या शिक्षकांना वर्गनियंत्रणाची जशी समस्या भेडसावते. तशी ती चित्रकलेच्या शिक्षकांना भेडसावत नाही. छडीविना शिक्षण हे चित्रकलेच्या तासालाच पहावयास मिळते, विद्यार्थीप्रिय शिक्षक हे विशेषण चित्रकला शिक्षकालाच लागू पडते जो कमीतकमी शब्दांचा वापर करतो तो उत्तम चित्रकला शिक्षक असतो. कारण एक चित्र हे हजार शब्दांचे काम करीत असते. चित्रकला शिक्षकाच्या जिभेचं काम त्याची बोटं करीत असतात.
परीक्षेचं पर्यवेक्षण हे आम्हा शिक्षकांच्यादृष्टीने कंटाळवाणं काम. पण तेच चित्रकलेच्या पेपरचं पर्यवेक्षण मात्र सुंदर पर्वणी असते. चित्र काढण्यात रममाण मुलं पाहून मन प्रसन्न होतं. इतर विषयाच्या पेपराच्यावेळी रूक्ष वाटणा-या त्यांच्या चेह-यांवर ओसंडणारा सृजनाचा आनंद पहातच रहावासा वाटतो.
मुलं जी गोष्ट शब्दात व्यक्त करु शकत नाहीत ती ते चित्रात व्यक्त करतात. चित्र जणू जाणीवेची चित्रलिपीच असते. चित्रं म्हणजे मुलांच्या जाणीवेचं प्रवेशद्वार असते. चित्रकलेच्या पेपराच्यावेळी उघडणारं हे द्वार अन्य विषयांच्या वेळी मात्र बंद असते.
चित्रांप्रमाणेच निबंधातही मुलांच्या नेणीवेचे प्रतिबिंब पडत असते. पण त्यासाठी निबंधाचे विषय त्यांच्या आवडीचे असावे लागतात. पण तसं घडत नाही व मुलं निबंधही पाठ करुन लिहीतात. पाठांतरही शेवटी कॉपीच असते. चित्रकलेच्या पेपरात मात्र कॉपी करता येत नसते. कॉपीमुक्त परीक्षा म्हणजे चित्रकला विषयाची परीक्षा.
ज्ञान, कला आणि धान्य सांडण्यातचं त्यांची सार्थकता असते. म्हणून कला शिक्षकाने सांडेस्तोवर कलेचं ज्ञान मुलांना दिलं पाहिजे. त्यासाठी चित्रकलेवर चित्रकला शिक्षकाचं नि:सीम प्रेम असावे लागते. अर्जूनाला जसा पोपटाचा फक्त डोळाच दिसत होता. तसं चित्रकला शिक्षकाला फक्त चित्रंच दिसली पाहिजेत. अन्य गोष्टींकडे त्याचा कल असणे ही गोष्ट कलेशी प्रतारणा ठरते. इतर विषयाचं ज्ञान देण्यासाठी इतर विषयाचे शिक्षक आहेत. ते कलेचं ज्ञान नाही देऊ शकत. म्हणून चित्रकला शिक्षकाने कलेशिवाय मुलांना इतर काही देवूच नये. 'गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे' अशी खंतावण्याची वेळ त्याच्यावर येऊ नये.
कलावंत हे स्वर्गाच्या अखेरच्या पायरीवर पोहचलेले पथिक असतात. त्यांच्यात नि स्वर्गात फक्त एका पावलाचे अंतर बाकी असते. म्हणूनच त्यांना गहन विषयांचंही सहज आकलन होते. अशा कलावंतांना 'कलायोगी' म्हणतात. असे कलायोगी शिक्षक मुलांना नंदनवनाची सफर घडवू शकतात. नंदनवनाची सफर घडविणारे कलाशिक्षक लाभणे, हे सद़्भाग्य असते. ते सद़्भाग्य मला लाभले. आमचे कलाशिक्षक म्हणायचे चित्रकला ही विश्वभाषा आहे. ज्याला ती अवगत आहे त्याला अन्य भाषा शिकण्याची गरज उरत नाही. निष्णात चित्रकला शिक्षक मुलांच्या हातांना चांगले वळण लावत असतो. मुलांचे हात जर कलेकडे वळले, तर ते गुन्हेगारीकडे वळत नाहीत. मुलांच्या कलागुणांना वाव मिळाला तर काळ्या-पांढ-याचा संघर्ष संपुष्टात येतो. मुलं स्वावलंबी बनतात. नोकरीच्या मागे धावण्याऐवजी कलेवर उपजीविका करु लागतात. कलांचा विकास होऊन समाजाचं कलवैभव वाढीस लागते. उत्तमोत्तम कलाकृतींचे सृजन घडून समाजाचे ऐश्वर्य वाढते.
🎨 कला शिक्षक..🙏🏻
संग्राहक........
आपला नम्र
चित्रकार- लेखक - संग्राहक........
श्री.अशोक रा. वेताळ
संस्थापक- अध्यक्ष : S.R.DIGITAL EDUCATION FOUNDATION
प्रत्येकात एक उत्तम लेखक दडलेला असतो. प्रत्येक माणसानं जेवढं आयुष्य जगलं आहे तेवढ्याच आयुष्यावर एक कादंबरी होइल एवढं मोठं असतं. आता हेच बघा ना, आपण स्वत: कसे जगलो ? आपल्या कुटुंबातील सदस्य, त्यांचे विवाह सोहळे, आपण नोकरीसाठी दिलेली मुलाखत किंवा व्यवसाय सुरू करताना आलेल्या अडचणी त्यावर केलेली मात या साऱ्या गोष्टी प्रत्येक माणसाच्या वेगवेगळ्या असतात. त्याला शब्दांच्या माळेमध्ये गुंफून फुलांची सुंदरशी माळ पाहणाऱ्याला मोहित केल्याशिवाय राहणार नाही.
कधी-कधी आपल्याला नेहमीच असं वाटत असतं की आपण काहीतरी लिहावं. लिहिलेलं कोणीतरी वाचावं. वाचून प्रतिक्रिया द्यावी. परंतु त्यासाठी आपल्याला योग्य व्यासपीठ कोण उपलब्ध करून देणार? आपलं लेखन कोण वाचणार? त्यावर प्रतिक्रिया तर दूरची गोष्ट, असं आपल्याला सतत वाटत रहातं. परंतु हो, हे शक्य आहे. तुम्ही एक रुपयाही खर्च न करता तुमचं स्वत:चं लेखन जगासमोर अगदी अवघ्या जगासमोर मांडू शकता. त्यासाठी आपल्याकडे केवळ एक संगणक आणि इंटरनेटची जोडणी असली की झालं. मग तुम्हाला मराठीत लिहायचं असेल तरीही काही अडचण नाही. चला तर मग या साऱ्या गोष्टी माझ्या ब्लॉगवर शेअर करा.
तुमच्यातील कवी , लेखक जागृत करूया.
शैक्षणिक,धार्मिक,सांस्कृतिक,सामाजिक प्रबोधन विषयक लेख कविता या शैक्षणिक ब्लोग वर शेअर करा.या शैक्षणिक ब्लोग चा उपयोग विदयार्थी,पालक, शिक्षक व समाजातील प्रत्येक घटकाला होईल अशी मी अशा बाळगतो. धन्यवाद !
लेखक व संग्राहक........आपला नम्र
लेखक
श्री.अशोक रा. वेताळ
संस्थापक-अध्यक्ष : S.R.DIGITAL EDUCATION FOUNDATION
चांगला उपक्रम.....हर्दिक शुभेच्छा ... संतरोहिदास संस्थान
ReplyDeleteधन्यवाद...
ReplyDeleteआपण सुरू केलेला उपक्रम खूप चांगला आहे .स्वतःचे बुक बनविण्यासंदर्भात कृपया मार्गदर्शन करा
ReplyDeleteनक्कीच आवडेल व माझ्या कडुन शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न असेलच... कृपया आपले नाव व ईमेल ID पाठवावा.. धन्यवाद
ReplyDeleteसर्वच नवोदित लेखकांची लेख उत्तम आहेत.
ReplyDeleteवाचताना माझ्या आई च्या आठवणी जागृत झाल्या...
खूप सुबोध शब्दात आईचे व्यक्तिमत्व मांडले आहे...आई शिवाय जगात दुसरे कोणी नाही हे अत्यंत खरे अहे.. मांडलेल्या भावना हृदयस्पर्शी आहेत...
ReplyDeleteआई बद्दलचा खूप सुरेख लेख आहे.... आईची जागा कोणीच भरू शकत नाही ही.... मनाला भावणारी कविता आहे....
ReplyDelete🙏
Deleteसरळ व समर्पक शब्दात आई चे थोर व्यक्तिमत्त्व मांडले आह... मन फुळवणारी ही कविता मला खूपच आवडली...
ReplyDeleteसरळ व समर्पक शब्दांत आईचे व्यक्तिमत्व मांडले आहे.... मनाला फुलवणारी ही कविता मला खूपच आवडली..
ReplyDeleteप्रस्तुत पुस्तकातिल सर्वच लेख खूपच छान अहेत... त्यतिल हरवलेली माझी आई या कवितेतील आपल्या आयुष्यतिल आईची उणीव प्रखरतेने भसवते....
ReplyDeleteसुंदर कविता चा संग्रह आहे, सोप्या शब्दात वर्णन केल्यामुळे अजूनच सुरेख...
ReplyDeleteधन्यवाद... 🙏
Deleteसुंदर कविता चा संग्रह आहे, सोप्या शब्दात वर्णन केल्यामुळे अजूनच सुरेख...
ReplyDeleteसुंदर कविता चा संग्रह आहे, सोप्या शब्दात वर्णन केल्यामुळे अजूनच सुरेख...
ReplyDeleteसुबोध शब्दात वर्णन केले असल्याने ही कविता मनाला खूपच आवडली...
ReplyDeleteअतिशय समर्पक शब्दात भाव मांडले असल्यामुळे किविता मनाला भारवते...
खूप सुंदर लेख आहे
ReplyDeleteखूप सुंदर लेख आहे
ReplyDelete