Monday, December 9, 2019

नव उपक्रम कृती संशोधन प्रकल्प नवोपक्रम प्रकल्प Kruti Sanshodhan prakalp Project for DSM Course


लेखक- श्री. अशोक वेताळ DSM Project इतिहास विषयाच्या अभ्यासाची विद्यार्थ्यांमध्ये रुची नसल्याची कारणे शोधून त्यावर उपाययोजना कृती संशोधन
श्री. अशोक वेताळ 


संशोधक - लेखक – मुख्याध्यापक
नवोपक्रम  प्रकल्प
Kruti Sanshodhan prakalp (DSM Project for Teachers)















































अनुक्रमणिका

अ .        प्रारंभिक विभाग
१.                 प्रमाण पत्र 
      २.    ऋणनिर्देश
ब .       मुख्य विभाग
प्रकरण १    १.१   प्रस्ताविक
           १.२   संशोधन अभ्यासाची गरज
           १.३   संशोधन अभ्यासाचे महत्त्व
           १.४   संशोधन समस्येचे शीर्षक
           १.५   संज्ञाच्या कार्यात्मक व्याख्या
           १.६   संशोधनाची उद्दिष्टे
           १.७   गृहितके
           १.८   परिकल्पना
           १.९   संशोधनाची व्याप्ती व मर्यादा
प्रकरण २    संबंधित साहित्याचा व संशोधनाचा आढावा
प्रकरण ३    संशोधन कार्यपध्दती
           ३.१   संशोधन पध्दती
           ३.२  संशोधन साधने
           ३.३   संशोधन नमुना
           ३.४   संशोधन प्रत्यक्ष कार्यपध्दती
प्रकरण ४    संकलित माहितीचे विश्लेषण व अर्थनिर्वचन
प्रकरण ५    सारांश, निष्कर्ष, व शिफारशी
           ५.१   सारांश
           ५.२   संशोधनाचे  निष्कर्ष
           ५.३   शिफारशी
           ५.४  संदर्भ साहित्याची सूची

1)    नाव:-  
श्री. अशोक रामचंद्र वेताळ 
S.R.Digital Education-Principal, Founder  President  
  2)     जन्म  तारिख :- 
     २४ – १२ – १९६३
  3)     वय :-      
    ५६ वर्ष
  4)      इमेल आयडी :- 

  5)     शैक्षणिक पात्रता :-
  1) S.S.C.- 1980
2)  H.S.C.- 1982                                          
    3)  B.A.   -  1991                                          
    4)  M.A.  – 2014                                         
  6)  व्यावसायि पात्रता :-     
    1)  A.T.D.- 1985
     
    2) A.M.  - 1992
                   
        3) D.S.M. – Diploma In School Management 2019 

  7)  शाळेचे नाव :-   
    मुख्याध्यापक - शिशु विकास मंदिर हायस्कूल 
  8) संपर्क क्र. :-    
    ०२२ २५०३६५०७
  9) अध्यापनाचे विषय :-      
    १) इतिहास
                
    २) COMPUTER
                 
    ३) ICT
  10) प्राविण्य असलेले विषय :-  
    १) सामाजिकशास्त्र , COMPUTER, ICT

  11) अवगत भाषा :- १) मराठी
                    २) हिंदी
                    ३) इंग्रजी
  12) अध्यापन :-     38 वर्ष सेवाकाळ                        

  13) लेखन :-       १) प्रेरणा वार्षिक अंक (बाल साहित्य)

  14) कृती संशोधन :-  
    १) विदयार्थीयांना इतिहास विषयाच्या अभ्यासाचीरुची
                       
        नसल्याची कारणे शोधणे व त्यावरील उपाय 
                         
    २) संत व संतांचे समाज प्रबोधन (संत रोहिदास )
                            
    ३) संतांचे कार्य व विचारधारा.
.
 15) प्रकल्प :-   
    १) त्रिकोणातील खेडे
                
    २) लोकसंख्येचा भस्मासुर
                
    ३) साक्षरतेचे फायदे
 16) नवोपक्रम :-  
    १) ज्ञनरचनावाद ( हसत खेळत शिका – PPT)
                
    २) इतिहास ( रायगडावर भटकंती – PPT)
                
    ३) हिरा शॉर्ट फ्लीम (Documentary Film)
                
    ४) नवोपक्रम माझी शाळा – ( PPT )
                
    ५) महायुद्ध – (PPT)
                                
    ६) हिटलर – (PPT)
  17) शैक्षणिक कार्य :-      
    १) संत रोहिदास शिक्षण संस्था (नाविमुंबई) – संस्थापक
               
    २) अशोका डिजिटल एज्यूकेशन फाउंडेशन – अध्यक्ष
                 
    ३) शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहीम राबविणे.
  18) सामाजिक कार्य :-      
    १) मागासवर्गीय, गरीब, गरजू, हुशार, होतकरू, विद्यार्थी
                  
    यांना मोफत शिक्षण देणे.
                
    २) अनुव्रत संकल्प यात्रा –
                  
    (नशा मुक्ती अभियान सामाजिक उपक्रम)
                
    ३) बेटी बचाव – बेटी पढाव अभियान
                
    ४ ) मोफत डिजिटल एज्यूकेशन
                
    ५) पुस्तक पेढी योजना

  19) अन्य तपशील:- 
    १) न्याय प्रभात वृत्तपत्र –Press Reporter,स्तंभ लेखन


 ऋणनिर्देश
                    शिक्षणपध्दतीचे मुख्य ध्येय व उद्दिष्ट हे आहे.” विद्यार्थांचा सर्वांगीण   विकास करणे.”  या विकासात शारीरिक,मानसिक, भावनिक, बौध्दिक, क्रियात्मक या   सर्वांचा समावेश होतो. यासाठी इतिहास या विषयाचे अध्यापन करताना पारंपारिक   पध्दतीपेक्षा आधुनिक पध्दतीचा वापर केला तर मनोरंजक होईल. यासाठी अध्यापन   करताना शैक्षणिक साधनाचा वापर केला पाहिजे. यामध्ये नकाशे, तक्ते, चार्ट, प्रतिकृती
, आलेख, चिञे, फोटो, आकृत्या प्रक्षेपण यंञे फळा ओ.एच.पी. व आकाशवाणी या सर्व   साधनाचा समावेश होतो.या सर्व साधनाचा वापर करुन अध्यापन केले तर विद्यार्थींचा योग्य असा विकास होतो.  कोणतेही कार्य व्यवस्थीत दर्जेदार  गुणवत्तापुर्वक आणि वेळेत पुर्ण करण्यासाठी संशोधकाला अनेक व्यक्तीचे मार्गदर्शन , सहकार्य घ्यावे लागते.जीवनात कोनत्याही क्षेञात यश संपादन करण्यासाठी उत्कंठा, इच्छा , प्रमाणिक प्रयत्न व योग्य मार्गदर्शन या चार गोष्टींची आवश्यकता असते. कृतीसंशोधन प्रकल्प पुर्ण करण्यासाठी ज्या अनेक व्यक्तींचे बहुमोल मार्गदर्शन लाभले त्या सर्वांचे ऋण व्यक्त करणे हे  संशोधक आपले कर्तव्य  समजतो.सदरचे कृती संशोधन करण्यासाठी अभ्यासक्रमात समावेश केला त्यामुळे संशोधकाला संशोधनासाठी ऊर्जा मिळाली त्याबद्दल यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे आभार.                   
संशोधन पद्धती
संशोधनाच्या पद्धती खालीलप्रमाणे *
)  ऐतिहासिक पद्धती
)  सर्वेक्षण पद्धती         
)  प्रायोगिक पद्धती                       
)  व्यक्ती अभ्यास पद्धती                      
)  वैकासिक पद्धती                      
)  कारणमिमांसा पद्धती                       
)  समवाय पद्धती

ऐतिहासिक पद्धती
शिक्षणामधील विविध वर्तमान समस्यांच्या निराकरणासाठी त्यांची पार्श्वभूमी स्पष्टहोण्याच्या दृष्टीने ऐतिहासिक संशोधन महत्त्वाचे आहेऐतिहासिक घटना किंवासध्याच्या साधनांची भूतकाळातीलचौकशी करण्यासाठी ऐतिहासिक पद्धती वापरतात.


सर्वेक्षण पद्धती
सध्याची स्थिती छोटया नमुन्यावरून शोधण्यासाठी सर्वेक्षण संशोधन वापरतात.

प्रायोगिक पद्धती
या गृहीतकांचे खरेखुरे परिक्षण करण्याची एकमेव पद्धतीम्हणजे प्रायोगिक पद्धती होयही भविष्यात रमणाऱी शास्त्रीय पद्धती आहेत्यामध्येसंशोधक नैसर्गिक गोष्टींवरून किंवा स्वत: प्रयोग करून आवश्यक ती माहिती उपलब्धकरतो.

संबंधित संशोधन साहित्याचा आढावा
प्रस्तावना
                   संबंधित संशोधन करण्यापुर्वी अथवा करत असताना जे जे संदर्भ साहित्य वाचले आहे. त्या संदर्भ साहित्याच्या धर्तीवरच या संशोधनाची दिशा ठरवली आहे. या संदर्भ साहित्याचा या संशोधनाला आधार मिळाला आहे.

प्रत्यक्ष कार्यवाही

                                    संशोधनाच्या तीन पध्दतीपैकी संशोधकाने प्रायोगिक पध्दतीचा वापर केला आहे. संशोधकाने इयत्ता ९ वी तील २० विद्यार्थींची निवड केली आहे. संशोधकाने माध्यमसंच तयार करुन प्रायोगिक गटावर उपचार केले व परिणामकारकता पाहिली प्रमाण प्रश्नावली तयार केली व या द्वारे मिळालेल्या माहितीवर प्रक्रिया केली.


विद्यार्थ्यांचे पाठ्य पुस्तकातील पाठ वाचन घेणे व तोंडी प्रश्न विचारणे
स्त्री मुक्ती चळवळ
                भारतात १९७५ नंतर स्त्री संघटनांच्या कृतिशील चळवळींना प्रारंभ झाला. मात्र भारताइतकी स्त्री जीवनाची दोन ध्रुवीय चित्रे क्वचितच इतरत्र आढळत असल्याने दोन्ही टोकाच्या स्त्रियांना समतोल मध्यांकडे आणण्याची शक्ती असणाऱ्या चळवळी भारतामध्ये रुजू शकलेल्या नाहीत.
                स्त्री संघटनांच्या खऱ्या अर्थाने कृतिशील चळवळीची १९७५ ते २००० ही २५ वर्षे होती. स्त्रियांचे प्रश्न अगणित आणि स्त्री चळवळींची शक्ती मर्यादित आणि आपल्याला भौगोलिक क्षेत्रातल्या प्रश्नांची बांधिलकी जास्त मानणारी. त्यामुळे काही विधायक कार्यक्रम हाती घेऊन स्त्रियांची परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी पावले उचललेली दिसून येतात. स्त्री मुक्ती संघटनेनेस्त्री मुक्तीची ललकारीहे चळवळीतल्या प्रबोधनात्मक आणि मनोरंजनात्मक सोप्या चालीवरच्या गाण्याचे पुस्तक तयार केले.
                महिला मंडळे, कारखाने, शेतमजूर स्त्रिया यांच्यासमोर कलापथकाचे कार्यक्रम करताना सुरुवातीला जोशपूर्ण म्हटल्या जाणाऱ्या या गाण्याने एकोप्याची भावना निर्माण होई आणि उत्साहपूर्ण वातावरणात पुढचे कार्यक्रम सादर होत. मुलगी झाली होहे असेच पथनाटय़ आणि प्रभावीपणे त्यातून दिसणारी स्त्री जीवनाची विदारक शोकांतिका यामुळे इतके परिणामकारक ठरले की त्याचे १२०० अधिक प्रयोग झाले. नऊ भाषेत त्याचे रूपांतर होऊन ते इतर राज्यांमध्ये पोचले. आंतरराष्ट्रीय महिला अधिवेशनातही ते सादर करण्यात आले. १९८६ मध्ये याच स्त्री मुक्ती संघटनेने प्रेरक ललकारीहे मुखपत्र सुरू केले. स्त्रियांचे आरोग्य, शिक्षण, दारिद्रय़, बेकारी, हिंसा, कुटुंबनियोजन, स्त्रीविषयक कायदे आणि पर्यावरण हे विषय त्यात प्रामुख्याने चर्चिले जात. दृश्य माध्यमे ही लिखित माध्यमांपेक्षा अधिक परिणामकारक असतात. त्यामुळे मासिक पाळी, गरोदरपण, बाळंतपण यांची शास्त्रशुद्ध माहिती देण्यासाठी कहाणी नहाणीची’, ‘कहाणी नऊ महिन्यांची’, ‘कहाणी जन्माचीअसे स्लाइड शो तयार करण्यात येऊन ते स्त्रियांपर्यंत पोचवले गेले. याच काळात पुण्यातून बायजामासिक निघत होते. ग्रामीण भागातील स्त्रियांचे प्रश्न आणि त्यासाठी चालणारे विविध उपक्रम यावर या मासिकाचा विशेष भर होता. मिळून साऱ्या जणीहे मासिकही स्त्री प्रश्नांनाच वाहिलेले असून गेली चौदा वर्षे स्त्री-पुरुष संवादावर विशेष भर देऊन ते अव्याहतपणे चालू आहे.
      १९८३ मध्ये सहेलीया दिल्लीतील स्त्री संस्थेने भारतातील स्त्री प्रतिनिधींची एक कार्यशाळा घेतली. स्त्रियांच्या जीवनात सकारात्मकता आणणे, स्त्रियांची एकजूट घनिष्ठ करणे, विविध प्रांतांतील स्त्रियांमध्ये संवाद प्रस्थापित करणे, त्यातून वर्गधर्मजातीभेद नष्ट करणे, मनोरंजनाच्या माध्यमातून स्त्रियांच्या समस्या पृष्ठस्तरावर आणणे इत्यादी उद्दिष्टय़े ठेवून यात गीत, नाटय़, नृत्य, चित्रकारी अशी विविध सत्रे आखली होती. महिलांच्या शक्तीच्या पारंपरिक स्रोतावर लक्ष केंद्रित करून दुर्गा, चंडी, काली या शक्तिमान देवतांच्या प्रतिमांचे आणि कर्तृत्वाचे पुनरुज्जीवन करून आधुनिक स्त्रीला तिच्या अंगातील छुप्या स्त्री शक्तीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न या दशकात १९९० ते २०००) प्रामुख्याने  झाला. यात इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शक्तिशील नारीचे प्रतीक म्हणून या राष्ट्रमातेच्या हातातून रक्त ठिबकत आहे अशी पोस्टर्सही होती. तेलंगणा आंदोलन आणि चिपको आंदोलनातील झुंजार स्त्रियांच्या कामाच्या कथा ऐकवून स्त्रियांना स्फूर्ती यावी म्हणून हैदराबादच्या स्त्री शक्ती संघटनेने कथाकथनाचे कार्यक्रमही अनेक ठिकाणी केले. महाराष्ट्रातही जिजाबाई, ताराबाई, अहिल्याबाई, राणी लक्ष्मीबाई इत्यादी पराक्रमी ऐतिहासिक स्त्रियांच्या आयुष्यावर अनेक ठिकाणी व्याख्यानमाला आयोजित झाल्या. तसेच स्त्री प्रश्नांवर लोकांमध्ये प्रबोधन करण्यासाठी गणेश उत्सव किंवा तत्सम प्रसंगी तरुण-तरुणींचे मानस समजण्यासाठी प्रश्नावली भरून घेण्यात आल्या आणि मग महाविद्यालयात त्याबद्दल चर्चा घेण्यात आल्या
  
विद्यार्थ्यांचे  अवांतर वाचन घेणे व तोंडी प्रश्न विचारणे
अवांतर वाचन पाठ 

      
एक विलक्षण व्यक्तित्व हमेशा के लिए अलविदा कह गया. भारत की 'अग्नि' मिसाइल को उड़ान देने वाले मशहूर वैज्ञानिक और पूर्व राष्ट्रपति एपीजे अब्दुल कलाम नहीं रहे. शिलॉन्ग आईआईएम में लेक्चर देते हुए उन्हें दिल का दौरा पड़ा. आनन-फानन में अस्पताल ले जाया गया, लेकिन डॉक्टर कुछ नहीं कर सके. 83 वर्ष के कलाम साथ छोड़ चुके थे .
      एपीजे अब्दुल कलाम का पूरा नाम अवुल पकिर जैनुल्लाब्दीन अब्दुल कलाम था. एक मछुआरे का बेटा अखबार बेचा करता था. यह कलाम के जीवन का शुरुआती सफर था. वे देश के चोटी के वैज्ञानिक बने और फिर सबसे बड़े राष्ट्रपति पद को भी शोभायमान किया. वे करोड़ों युवाओं के प्रेरणास्रोत रहे. अपनी वाक कला से हजारों की भीड़ को मंत्र-मुग्ध करते रहे. युवाओं में नया करने का जोश और हौसला भरते रहे. दो दर्जन किताबों में अपने अनुभव का निचोड़ पेश किया.

  
विद्यार्थ्यांचे  हावभाव युक्त पाठ वाचन घेणे

      डॉ. आंबेडकर यांच्यावर संत कबीर, महात्मा जोतिराव फुले व राजर्षी शाहू महाराज या व्यक्तिमत्त्वांचा, त्यांच्या विचारांचा व कार्याचा मोठा प्रभाव होता.

डॉ. आंबेडकर हे कर्ते सुधारक होते. सर्व माणसे समान आहेत, कोणीही उच्च किंवा नीच नाही अशी त्यांची ठाम धारणा होती. जातीय उतरंड, चातुर्वर्ण्य व्यवस्था, या व्यवस्थेत शूद्र मानल्या गेलेल्या जातींवर होणारे अत्याचार यांबाबत त्यांच्या मनात विलक्षण चीड होती. आपल्या प्रत्येक कृतीतून त्यांनी समानतेचे धडे दिले. ते जेव्हा लंडनहून भारतात परत आले, तेव्हा परिचित लोकांनी, बाबासाहेबांनी मोटारीने घरी जावे असा आग्रह धरला. पण त्यास बाबासाहेबांनी नकार दिला. मग लोकल रेल्वेच्या प्रथम वर्गातून तरी बाबासाहेबांनी प्रवास करावा असा आग्रह लोकांनी धरला. पण तोही आग्रह मोडत त्यांनी आपल्या रेल्वेच्या तिसर्‍या वर्गातून प्रवास केला. जेव्हा ते घरी गेले, तेव्हा त्यांच्या भावाने त्यांना बसण्यासाठी टेबल खुर्ची आणण्यासाठी धावपळ सुरू केली. पण इथेही बाबासाहेबांनी घरातील घोंगडीवर बसणेच पसंत केले. या कृतीतून त्यांनी समानतेचे तत्त्व बिंबवले. त्यांनी या कृतीतून स्पष्ट केले की शिक्षण घेऊन ते सुशिक्षितझाले असले, तरी समाजबांधवांना ते विसरलेले नाहीत, त्यांची दु:खे त्यांच्या स्मरणात आहेत.


      डॉ.आंबेडकरांनी १९२७ ला महाडच्या (जि. रायगड) चवदार तळयावर अस्पृश्यांनादेखील पाणी भरता यावे यासाठी सत्याग्रह केला. स्वत: डॉ.आंबेडकर जरी हिंदू देव देवतांना मानत नव्हते, तरीही त्यांनी १९३० ला नाशिक येथे काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह सुरू केला. कारण जर मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळाला, तर त्यामुळे अस्पृश्यतेचा प्रश्र्न सुटण्यास हातभार लागेल, असे त्यांचे मत होते. हे सत्याग्रह केवळ त्या तळ्यापुरते किंवा मंदिरापुरते मर्यादित नव्हते, तर तो लढा सन्मानाने जगण्याच्या हक्कांसाठी होता. तो लढा तत्कालीन अस्पृश्यांमधील आत्मविश्र्वास वाढवण्यासाठी आणि मानवी हक्कांसाठी होता. याचसाठी त्यांनी वर्णव्यवस्थेचे समर्थन करणार्‍यामनुस्मृतीया ग्रंथाचे जाहीर दहनही केले. १९१७ ते १९३५ या काळात हिंदू धर्मात राहूनच त्यांनी अस्पृश्यता नष्ट करण्याचा प्रयत्न केला, धर्मसुधारणा करण्याचा प्रयत्न केला. पण हे प्रयत्न अयशस्वी ठरत आहेत, कमी पडत आहेत हे त्यांच्या लक्षात आले. तसेच तथाकथित उच्चवर्णीय लोक आपल्या वर्तनात व मानसिकतेत बदल करत नाहीत हेही त्यांच्या लक्षात आले म्हणूनच... १९३५ मध्ये त्यांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाहीअशी घोषणा येवला येथे केली. १९५६ मध्ये सुमारे पाच लाख अस्पृश्य बांधवांसह बौध्द धर्माची दीक्षा घेऊन डॉ. आंबेडकरांनी धर्म-परिवर्तनाची घोषणा प्रत्यक्षात आणली.

प्रश्नावली
विदयार्थी नाव -------------------------------- वर्ग ---------------तुकडी --------------    

प्रश्न क्र

प्रश्न
होय
नाही

मला इतिहास पाठ वाचायला आवडतात





वाचताना माझ्या नजरेतून शब्द किंवा ओळी सुटत नाहीत





मला इतिहासातील घटना नीट आठवतात





संसोधकांची नवे निट लक्षात राहतात





मला इतिहासातील सनावळ्या निट लक्षात राहतात





मला इतिहासातील इंग्रजी शब्द व जोडाक्षरे वाचता येतात





मला इतिहासातील प्रसंग निट लक्षात राहतात





मी काय वाचले ते आठवण्यात आडचन येते





मी जे वाचन करतो त्याचे मला आकलन होते




१०

वाचनाच्या सरावाने इतिहास विषयाची  रुची वाढवता येते, हे मला माहित आहे, त्या दृष्टिने मी जाणीवपूर्वक प्रयत्न करतो 






प्रश्न क्र

प्रश्न

होय
नाही

मला इतिहास पाठ वाचायला आवडतात


१०
१५

वाचताना माझ्या नजरेतून शब्द किंवा ओळी सुटत नाहीत


१९

मला इतिहासातील घटना नीट आठवतात


११
१४

संसोधकांची नवे निट लक्षात राहतात


१६

मला इतिहासातील सनावळ्या निट लक्षात राहतात


११
१४

मला इतिहासातील इंग्रजी शब्द व जोडाक्षरे वाचता येतात


१६

मला इतिहासातील प्रसंग निट लक्षात राहतात


१०
१५

मी काय वाचले ते आठवण्यात आडचन येते


१५
१०

मी जे वाचन करतो त्याचे मला आकलन होते


१०
१५
१०

वाचनाच्या सरावाने इतिहास विषयाची  रुची वाढवता येते, हे मला माहित आहे, त्या दृष्टिने मी जाणीवपूर्वक प्रयत्न करतो 


१९


निरीक्षण सूची
सदर प्रश्नावलीचा अभ्यास केल्यानंतर संशोधकाच्या लक्षात आले की २५ पैकी १० विदयार्थी यांना इतिहास पाठ वाचायला आवडतात.१५ विदयार्थी यांना इतिहास पाठ वाचायला आवडत नाही.
वाचताना त्यांच्या नजरेतून शब्द किंवा ओळी सुटत नाहीत असे ६ विदयार्थी यांना वाटते.
२५  पैकी ९  विदयार्थी यांना संसोधकांची नवे निट लक्षात राहतात.१६ विदयार्थी यांना संसोधकांची नावे निट लक्षात राहत  नाहीत. ११ विदयार्थी यांना इतिहासातील सनावळ्या निट लक्षात राहतात तर
१४ विदयार्थी यांना इतिहासातील सनावळ्या निट लक्षात राहत  नाहीत. ९ विदयार्थी यांना इतिहासातील इंग्रजी शब्द व जोडाक्षरे वाचता येतात, १६ विदयार्थी यांना इतिहासातील इंग्रजी शब्द व जोडाक्षरे वाचता येत नाहीत.
      इतिहासातील प्रसंग निट लक्षात राहतात असे १० विदयार्थी आहेत. इतिहासातील प्रसंग निट लक्षात राहत नाहीत असे १५ विदयार्थी आहेत. काय वाचले ते आठवण्यात आडचन येते असे १५  विदयार्थी आहेत तर १० विदयार्थी यांना काय वाचले ते आठवण्यात आडचन येत नाही.
      १० विदयार्थी यांना जे वाचन करतो त्याचे मला आकलन होते तर १५ विदयार्थी यांना जे वाचन करतो त्याचे मला आकलन होत नाही.
      वाचनाच्या सरावाने इतिहास विषयाची  रुची वाढवता येते, हे ६ विदयार्थी यांना माहित आहे, त्या दृष्टिने ते जाणीवपूर्वक प्रयत्न करतात व १९  विदयार्थी यांना याची जाणीव नाही हे संशोधकाच्या लक्षात आले.
      सदर प्रश्नावलीचा अभ्यास केल्यानंतर विदयार्थ्याना वाचनाच्या सरावाने इतिहास विषयाची  रुची वाढवता हे  विदयार्थी यांना माहित नाही , त्या दृष्टिने ते जाणीवपूर्वक प्रयत्न ही  करत नाहीत,   विदयार्थी यांना या बाबत  जाणीव नाही हे संशोधकाच्या लक्षात आले म्हणून त्या साठी संशोधकाने प्रयत्न करण्यास सुरुवात केली.
इतिहास व राज्याशास्र सामाजिक शास्त्र
इयत्ता :- १० वी
प्रश्न पत्रिका व विषयाचे मूल्यमापन

लेखी परीक्षा
गुण विभाजन
एकूण गुण
वेळ
१.     इतिहास व राज्याशास्र
२८ +१२
४० गुण
२ तास
२.     भूगोल व अर्थशास्र
२८ +१२
४० गुण
२ तास
३.     अंतर्गत गुण

२० गुण


एकूण गुण
१०० गुण


लेखी परीक्षा : घटक निहाय गुण विभाजन ( इतिहास )
अ.क्र.
घटक
गुण
विकल्पसह
प्रकरण १
०६
०९
प्रकरण २
१२
१७
प्रकरण ३
०४
०५
प्रकरण ४
०६
०८

एकूण गुण
२८
३९

लेखी परीक्षा : घटक निहाय गुण विभाजन (राज्याशास्र )
अ.क्र.
घटक
गुण
विकल्पासह
प्रकरण १
०३
०४
प्रकरण २
०२
०४
प्रकरण ३
०३
०४
प्रकरण ४
०४
०६

एकूण गुण
१२
१८

अंतर्गत गुण:- (२० ) – चाचणी १० व गृहपाठ १० = एकूण गुण ( २० )

संशोधकांनी इतिहास विषय शिकवणे तसेच शिकणे अधिक सोपे व रंजक होण्यासाठी Videos व slideshow तयार केले आहेत. नक्कीच याचा फायदा अध्ययन अध्यापनत होईल. 🙏धन्यवाद 🙏

 संशोधक - लेखक – मुख्याध्यापक

श्री. अशोक वेताळ 











3 comments:

CREATIVE E BOOK.COM

POPULAR POSTS