BAL SAHITYA

Bal Sahitya
Prerana Ank
SHISHU VIKAS MANDIR HIGH SCHOOL

शिशु विकास मंदिर हायस्कूल मधील विद्यार्थ्यांचे बाल साहित्य..




======================================================
कवी :- श्री सुनील पवार Shri.Sunil Pawar
👽 कोरोना भावा 👽*
*कोरोना भाऊ,  नको मागं धावू,*

*घालतीया साकडं रे*
*घालतीया साकडं कोरोना*
*घालतीया साकडं रे. . . . . . ।।धृ।।*
*नाक तोंड बांधून बाहेर जाईन*
*अंतर ठेवून भाजी घेईन*
*गर्दीच्या ठाई,  जाणार नाय बाई*
*ठेव तू धड धाकडं रे*
*घालतीया साकडं कोरोना*
*घालतीया साकडं रे. . . . . .।।१।।*
*गरमागरम घेईन पाणी*
*सॅनिटायझरला ठेवीन ध्यानी*
*धुवेन हात,  नको तुझी साथ*
*करू नको काही वाकडं रे*
*घालतीया साकडं कोरोना*
*घालतीया साकडं रे. . . . . . .।।२।।*
*विनाकारण खाली जाणार नाय*
*सरकारी सूचना ध्यानी ठेवल्या हाय*
*मुंबई जान,  गळ्याची आन*
*नको स्वप्नांचं तुकडं रे*
*घालतीया साकडं कोरोना*
*घालतीया साकडं रे . . . . . .।।३।।*
*राजा रंकांची खंत नाही तुला*
*उचलून नेतोय पाहिजी त्याला*
*वाट नको पार, जीवाला घोर*
*नको मसणात लाकडं रे*
*घालतीया साकडं कोरोना*
*घालतीया साकडं रे . . . . . .।।४।।*

*कवी :- श्री सुनील पवार*
         *९८६९०२८८५४*
=====================================
GO CORONA....GO CORONA...CORONA...GO ..
कोरोना कोरोना जारे
आता तरी तु जा
जनता झाली वेडी,पाडली पायी बेडी
घर वाटतय तुरुंगवास
आता तरी तु जा
जारे जा  जारे जा  जारे
कोरोना कोरोना जारे
आता तरी तु जा......।।ध।।
आई बाळाची केली तु ,ताटा तुट
किती कुटुंबाची करतो,फाटा फुट
भेट होवू दे लेकरांची
आता तरी तु जा..जारे जा....।।१।।
नाही उन वारं,काकी तान्हं पोरं
चाले गावची वाट, आहे जिवा घोरं
गेला चालून वाटत जिव
आता तरी तु जा..जारे जा....।।2।।
 होणार नवरा नवरी,आता पडली दुरं
आहे भेटीला ते,किती आतुर
भेट होवू दे मंडपात
आता तरी तु जा....जारे जा...।।३।।
डॉकटर नरसेस,काम रात दिन
सेवा पेशंटची करण्या, आहे रे कोण
लागण करू नको त्यांना
आता तरी तु जा..जारे जा....।।४।।
सोडून घर दार,आहे रस्त्यावर उभा
खातो दोन घास रस्त्यावर, हा पोलिस दादा
हल्ला होतोय त्याच्या वर
आता तरी तु जा....जारे जा...।।५।।
          कवी सुनिल पवार
                9869028854
=========================
चंदा मामा येरे......चंदा मामा येरे...
माझ्याशी खेळायला ये
चांदण्यांशी खेळ तू खेळू नको
माझ्याशी खेळायला ये ये 
चंदा मामा येरे
माझ्या खेळायला ये ।।ध।I
खाली जमीन सागर
तुला चंदण्यांची चादर
गप्पा गोष्टी मारण्यास
खाली एकदा ये
खाली ये खाली ये खाली ये
चंदा मामा ये रे............।।१।।
खाली आहे पवित्र गंगा
तुला आहे आकाश गंगा
पाण्यात डुपकी मारण्यास
खाली एकदा ये
खाली ये खाली ये खाली ये
चंदा मामा ये रे.........।।२।।
खाली आहे हिरवी झाडी
तुला आहे उंच माडी
जावू बागेत फिरण्यास
खाली एकदा ये
खाली ये खाली ये खाली ये
चंदा मामा ये रे.........।।३।।
           कवी  सुनिल पवार
                 सायन मुंबई
              9869028854
================================
लेखक श्री. सुनील पवार
💦💦गारपीट 💦💦


No comments:

Post a Comment

CREATIVE E BOOK.COM

POPULAR POSTS