पब्लिक स्कूल दिवा या शाळेत गुरु पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा
शुक्रवार दिनांक 19 जुलै 2024 रोजी पब्लिक स्कूल दिवा या शाळेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.विनोद पाटील सर, मातृसेवा फाउंडेशनच्या संस्थेच्या अध्यक्षा संध्या सामंत, संस्थेचे ट्रस्टी सन्माननीय डॉक्टर सुनील कर्वे तसेच संस्थेचे सहकारी, त्याचबरोबर नवी मुंबई संत रोहिदास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.अशोक वेताळ सर तसेच दिवा पब्लिक स्कूल चे सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला गेला.
सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. गुरु पौर्णिमा उत्सवानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर करून, गुरु पौर्णिमा विषयी माहिती व आपल्या भाषणामध्ये गुरु महिमा विद्यार्थ्यांना सांगितला. यावेळी मातृसेवा फाउंडेशनच्या वतीने, शिक्षण क्षेत्रात गेली ३० वर्षाहून अधिक वर्षे कार्यरत असलेले सुनील कर्वे, ह्यानी मुलांना मार्गदर्शन करून हसत खेळत गणित विषयावर उपक्रम घेतला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सौ.संध्या सामंत व श्री.अशोक वेताळसर यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना हजार वह्या , शिक्षकांना शिकवण्यासाठी मोठा फळा व इतर शालेय शैक्षणिक साधनाचे वाटप करण्यात आले.
सौ.संध्या सामंत यांनी मातृसेवा फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली तसेच शाळेसाठी येत्या काळात वाचनालयासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. श्री.अशोक वेताळसर यांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
दिवा पब्लिक स्कूल या शाळेत ९००हून अधिक विद्यार्थी मराठी व सेमि इंग्लिश माध्यमात शिकत आहेत. हया उपक्रमामुळे त्यांच्या पंखाना थोडे बळ मिळाले आहे गरीब, गरजु, होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटप व शैक्षणिक साधन मातृसेवा फाउंडेशन तर्फे दिल्याबद्दल संस्थेचे, संस्थापक अध्यक्ष श्री पाटील विनोद यांनी आभार मानले, सर्व विद्यार्थी पालक व शिक्षक वर्गांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता केली.
!! ऑनलाइन स्वयं अध्ययन आजच्या काळाची गरज !!
स्वयंअध्ययन म्हणजे विद्यार्थी वर्गाबाहेर त्याच्या सोयीनुसार वेळेनुसार अभ्यासाचे स्वतः नियोजन व नियंत्रण करीत असतो. आजच्या या लॉकडाउन च्या काळात स्वयं अध्ययनाची नितांत आवश्यकता आहे असे माझे मत आहे.
स्वयम् अध्ययनाचे फायदे........
विद्यार्थी आपणास आवडणाऱ्या विषयांवर घटकांवर लक्ष केंद्रित करून स्व अनुभवाच्या आधारे व विविध माध्यमातून मिडीया व्हाट्सअप इंटरनेट गुगल इत्यादी सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक माध्यमाद्वारे डिजिटल माध्यमातून निरनिराळे कौशल्य विद्यार्थी हस्तगत करून स्वयंमूल्यमापन करत असतो.
विद्यार्थी यातून विविध घटकांवर सखोल विचार करून आपली स्मरण शक्ती व आकलन क्षमता वाढवू शकतो. स्वतःच्या वेळेनुसार मुक्तपणे विद्यार्थी शिकत असतो. त्याला वेळेचे बंधन नसते.
विद्यार्थी अभ्यासासाठी इतरांवर अवलंबून न राहता स्वतः अनेक विषयाचा व त्याच्या आवडीच्या विषयाचा अभ्यास करत असतो.
स्वयंअध्ययन पहिल्यांदा वेळखाऊ कटकटीचे त्रासदायक वाटते पण एकदा ते जमले कि विद्यार्थ्यांना स्वयम् अध्ययनाची सवय लागते व त्याचा फायदाच विद्यार्थ्यांना होतो.
अशाप्रकारे स्वयंअध्ययन हे भविष्यकाळातील प्रभावी साधन आहे व भविष्यातील प्रभावी अध्ययन पद्धती म्हणून ऑनलाईन स्वयंअध्ययन पद्धतीचा पाठपुरावा करावाच लागेल आजची ही परिस्थिती पाहता विद्यार्थी व शिक्षकांना स्वयंअध्ययन पद्धती साठी तयार व्हावेच लागेल.
धन्यवाद!!
लेखक
श्री. अशोक वेताळ
माजी मुख्याध्यापक - शिशु विकास मंदिर हाय स्कूल कुर्ला मुंबई.
------((())) - - - - - ((())) - - - - -
Mr. Gulab N. Tambe
ZOOM APP
प्रथम मोबाईल प्ले स्टोअर मधुन ZOOM app डाऊनलोड करा.
1 ZOOM या आयकॉन वर क्लिक करा.
2 New meeting ऑरेंज रंगाच्या व्हीडिओ आयकॉन वर क्लिक करा.
3 निळ्या रंगाचे Start a Meeting अक्षरावर क्लिक करा.
4 Connecting असा Massej येईल.
5 तुमचे नाव दिसेल.. त्या खाली participants या आयकॉन वर क्लिक करा.
6 left side ला Invite icon वर क्लिक करा.
7 Invite Massaging यावर क्लिक करा.
8 To display होईल या ठिकाणी नाव सिलेक्ट करणे. ज्यांचे बरोबर बोलायचे आहे त्या सर्वांची नावे सिलेक्ट करा.
9 Massej send बटनावर क्लिक करा.
10 त्या व्यक्तींना आलेल्या Massej वर क्लिक करा असे सांगा... Zoom व्हिडिओ कॉन्फरन्स सुरू होईल धन्यवाद
मार्गदर्शक -
Mr. Gulab N. Tambe
मार्गदर्शक -
Mr. Gulab N. Tambe
श्री. गुलाब तांबे सर, आजच्या घडीला फारच उपयुक्त उपक्रम आहे. नक्कीच विद्यार्थ्यांना याच फायदा होईल. आपले मनःपूर्वक अभिनंदन सर, अशीच प्रगती होत राहो, उपक्रमास शुभेच्छा
ReplyDeleteसर फारच चांगला उपक्रम, आपला आम्हाला अभिमान आहे.
ReplyDeleteहार्दीक शुभेच्छा
🙏श्री. आर. के. सावंत - - उद्योजक 🙏
धन्यवाद Mr. R. K. Sawnt saheb, आपल्या शुभेच्छा आम्हास प्रेरणादायी आहेत. 🙏धन्यवाद 🙏
ReplyDelete