Showing posts with label VIRUS CORONA. Show all posts
Showing posts with label VIRUS CORONA. Show all posts

Saturday, April 4, 2020

Free Story Books माझा मोफत वाचन कट्टा

🎨आत्ता वाचा मोफत सुप्रसिध्द लेखकांचे साहित्य 🎨
ऑनलाईन प्रेरणा वाचन कट्टा 








 चित्रकार-लेखक- माजी मुख्याध्यापक 

संस्थापक अध्यक्ष संत रविदास सेवाभावी सामाजिक शैक्षणिक संस्था नवी मुंबई. 

श्री. अशोक वेताळ 



चांभाराचं पोर अण त्याचा आसूड...
 (भाग 2)
"अर.. अश्या.. उठ की र.." "साळत जायचं नाही कारे?"  "आज साळचा पहिला दिस हाय.."
नानाचा आवाज ऐकून "अश्या" गडबडून जागा झाला. कशीबशी आंघोळ करून बंडी अंगात चढवली.. 
फुटकी खापराची पाटी व घोंगडी घेऊन तो तयार झाला. शाळेत जाण्याची उत्सुकता त्यालाही लागली होती.

नाना आणि अश्या  झरझर चालत शाळेकडे निघाले. गावाच्या वेशीवर  पाटलाच्या पडक्या वाड्यात शाळा भरत होती.  फुटकी पाटी व मळकट घोंगड सांभाळत अश्या व नाना शाळेजवळ पोहोचले. जेमते एका छोट्या खोलीत भिंतीला लाकडी फळा टांगला होता. मोडक्या खुर्चीवर गुरुजी बसले होते. वर्गातील दोन-चार बाकड्यांवरती सात आठ मुले दाटीवाटीने बसली होती. खेडे गावत पूर्वी पहिली ते चौथी पर्यंतची शाळा एकाच वर्गात भरत होती. पहिली ते चौथी वर्गांना एकच शिक्षक शिकवत असत.

वाड्याच्या दरवाजात दोघेही थबकले...
 गुरुजी कडे पाहून नाना दारातूनच म्हणाला.. 
गुरुजी मला या माझ्या पोराला साळत धाडायचेय..
बसल्या जागेवर गुरुजींनी आमच्या अवतारा कडे पाहिले आणि म्हणाले.. 
"तुझ्या पोराच वय काय?" 
"असल  साडेचार पाच वर्ष.". 
नाना अदबीनं म्हणाला.. 
पोराचे नाव काय? 
आश्या.. नानानं उत्तर दिले.. 
मास्तर आश्चार्यांनी म्हणाले.. 
मुलाचे नाव कधी आश्या.. असते का? हे तर मुलीचे नाव आहे. 
तसा नाना ओशाळला व म्हणाला.. त्याच्या आज्ज्यानं "अशोक" नाव ठेवलं हाए.. पण आम्ही सगळे त्याला" आश्या" च म्हणतो.. 
अरं नाना तस नाही.. शाळेत हजेरी पुस्तकात खर नाव लिहावे लागत... मास्तर त्रासून म्हणाले.. त्यांनी पुढे विचारले 
धर्म व जात कनती? 
नानांनी डोके खाली घालून म्हणाला.. 
"हिंदू चांभार" 
हे ऐकून वर्गातील बाकड्यावर बसलेल्या सुवर्ण समाजातील मुलांनी एकच गलका केला.. 
चांभाराचं पोर.. चांभाराचं पोर...
गुरुजींनी मुलांना गप्प केल आणि नानाला म्हणाले..
एक काम कर तुझ्या पोराला दरवाज्यापाशी घोंगडीवर बसीब.. आण तू निघ....
तसा नाना मागे फिरला. आपला मुलगा शाळेत जाऊ लागला याचा परम कोटीचा आनंद त्याच्या चेहर्‍यावर दिसत होता. मला शिकता आले नाही पण माझ्या मुलाने खूप शिकाव या साठी त्याची धडपड चालली होती. 

“अश्याने” शाळेच्या दरवाजा बाहेर घोंगडी पसरली व त्यावर मांडी घालून बसला. फुटकी पाटी मांडीवर ठेऊन फळ्यावर एक दोन अंक गिरवू लागला. काही वेळाने गुरुजी त्याच्या जवळ आले आणि म्हणाले...

"हे बघ अशोका, तू वर्गाच्या आत यायचं नाही.. इथेच बसून मी जे शिकवतो ते शिकायचं आणि वर्गात कोणत्याही मुलाला शिवायचं नाही, म्हणजे हात लावायचा नाही.
“ अश्याने” मानेनेच हो हो म्हंटले.. 

“अश्याचा” शाळेचा पहिला दिवस शाळेच्या वर्गाबाहेर शाळेच्या दरवाज्यात सुरू झाला... 
शाळा सुटल्यावर “अश्या “ खापराची फुटकी पाटी आणि आपली घोंगडी काखेत दाबून, पाटी सांभाळत घरच्या दिशेला निघाला. आजूबाजूची सुवर्णाची मुलं एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून, गप्पा मारत, हसत खिदळत  घरी चालली होती, परंतु “अश्या “कडे मात्र कोणाचेच लक्ष नव्हते..  "अश्या" खाली मान घालून, विचार करत चालला होता.. त्याला कळले नाही, गुरुजींनी आपल्याला वर्गाबाहेर दरवाज्यात का? बसवले, शाळेच्या वर्गात बाकड्यावर का? बसू दिले नाही. पावसाचे दिवस होते रस्त्याने चिखल झाला होता, तसाच चिखल तुडवत तो आपल्या घरच्या दिशेला निघाला निशब्द एकटाच...
क्रमशः..... 
लेखक :- श्री. अशोक वेताळ “अशोका”
माजी मुख्याध्यापक- शिक्षण महर्षी कै. रविकांत अणावकर गुरुजी संकुल शिशु विकास मंदिर हायस्कूल कुर्ला मुंबई. 
संस्थापक अध्यक्ष- संत रविदास सेवाभावी सामाजिक शैक्षणिक संस्था नवी मुंबई. 
विशेष कार्यकारी अधिकारी SEO (महाराष्ट्र राज्य शासन.) 
Online प्रसिद्धी हक्क.. 

 S. R. EducationalSantha Navi Mumbai








दिवा पब्लिक स्कूल, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व वाचनालयासाठी मोफत पुस्तक वाटप

आज दिनांक 22 जानेवारी रोजी आपल्या दिवा पब्लिक स्कूल या शाळेत माघी गणेश उत्सवनिमित्त आयोजित कार्यक्रमात शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार...

POPULAR POSTS