Saturday, April 14, 2018

NEW WRITERS E BOOK LIBRARY ऑनलाईन लेख संग्रह, पुस्तक संग्रह व कव्या संग्रह...

तुमच्यातील कवीलेखक जागृत करूया.......श्री. अशोक वेताळ 
  शैक्षणिक,धार्मिक,सांस्कृतिक,सामाजिक प्रबोधन विषयक पुस्तक लेख कविता या शैक्षणिक ब्लोग वर शेअर करा.या शैक्षणिक ब्लोग चा उपयोग विदयार्थी,पालक, शिक्षक व समाजातील प्रत्येक घटकाला होईल अशी मी अशा बाळगतो. धन्यवाद !!!
लेेेेेेखिका -सौ. स्नेहा कमलेश केसरकर
Mrs. Sneha Kamlesh Kesarkar
ती ...आणि  फक्त तीच...
रिमझिम पाऊस... थंडगार वारा... टप टप पडणारे पाण्याचे थेंब... बेधुंद पणे वाहणाऱ्या, बनवलेल्या कागदाच्या बोटी... आणि प्रत्येक बोटीवर प्रत्येकाने स्वछंदपणे लिहिलेले ध्येयाचे ठिकाण...

Maza Katta All Students And Teachers-VETAL ASHOK मुक्त अविष्कार व्यासपीठ सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी


CREATIVE ART -ऋतुजा ज्ञानदेव साळवे , महाड, रायगड

Sant Rohidas ( Ravidas) Charitar,Charmkar Samaj Rachana

संत रोहिदास महाराज जिवन चरित्र 





संत रोहिदास जयंती निमित्त लेख...

*तारामंडलातील  तेजस्वी तारा म्हणजे संत रोहिदास आहेत!*
-------------------------
डॉ.श्रीमंत कोकाटे
-------------------------

                                          संत रोहिदास हे पंधराव्या शतकातील एक महान संत होऊन गेले. त्यांचा जन्म वाराणशी तथा काशी या ठिकाणी झाला. बालपणापासूनच ते अत्यंत जिज्ञासू होते. वाडवडिलांच्या पारंपारिक व्यवसायात न रमता लोकप्रबोधनात ते तल्लीन होत असत. त्यांना लोककल्याणकारी धर्म अपेक्षित होता. त्यांना लिंगभेद, जातीभेद मान्य नव्हता. त्यांनी कर्मकांडाला विरोध केला. ते बुद्धिप्रामाण्यवादी होते.

                     *मन चंगा तो कठोती मे गंगा l* 

                                               असे ते नेहमी सांगत. भारतीय परंपरेमध्ये पापक्षालन आणि पुण्यप्राप्तीसाठी गंगास्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, परंतु संत रोहिदास यांनी गंगास्नानाने पापक्षालन होत नाही, तर ते प्रामाणिकपणाने आणि स्वच्छ आचरणाने होते. मन स्वच्छ ठेवा, मग कोणत्याही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी स्नान करण्याची आवश्यकता नाही, असे त्यांचे मत होते. त्यांनी निर्गुण भक्तीचा पुरस्कार केला. लोककल्याण हा त्यांचा भक्तिमार्ग होता.

                                       संत रोहिदास यांचा संपूर्ण देशभर प्रभाव होता. त्यांनी संपूर्ण भारत यात्रा केली. पूर्व भारत, दक्षिण भारत, पश्चिम भारत आणि उत्तर भारत अशा संपूर्ण देशाला प्रभावित करण्याचे सामर्थ्य त्यांच्या विचारांमध्ये आणि वाणीमध्ये होते. संत मीराबाई या सुप्रसिद्ध संत त्यांच्या अनुयायी होत्या. संत रोहिदास यांचे ४१ अभंग शीख धर्माच्या पवित्र अशा गुरू ग्रंथसाहेबमध्ये आहेत. 

                                         जात, धर्म, पंथ, प्रांत या भेदापलीकडे गेलेला महामानव म्हणजे संत रोहिदास आहेत. त्यांनी           वर्णव्यवस्थेला कडाडून विरोध केला. त्यांचे विचार आणि कार्य क्रांतिकारक आहे. त्यांचे विचार आणि कार्य मानवतावादी आणि लोककल्याणकारी आहे. विश्वविख्यात तत्ववेता आचार्य ओशो रजनीश म्हणतात की संत रोहिदास म्हणजे सर्वात अधिक चकाकणारा तारामंडलातील तारा आहे. त्यांना प्रदीर्घ आयुष्य लाभले.

- डॉ.श्रीमंत कोकाटे

 

*चांभारगड*

------------------------ 

शिवाजी महाराजांच्या काळाच्या पूर्वीपासूनच चांभारगड हा किल्ला अस्तित्वात होता. शिवाजी महाराजांनी रायगडाला स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केल्यानंतर राजधानीच्या संरक्षणाच्या दृष्टीने रायगडाच्या समुद्राच्या दिशेने असलेल्या किल्ल्यांना अधिक महत्त्व देण्यात आले. महाडपासून रायगडाच्या वाटेने निघाले की उजव्या बाजूला एक डोंगर लागतो या डोंगरावरच चांभारगडाची उभारणी झाली आहे. रायगडाच्या दक्षिण बाजूने सिद्धी जोहर च्या आक्रमणाचा सतत धोका असल्यामुळे रायगडाच्या मार्गात येणाऱ्या चांभारगड ,सोनगड या किल्ल्यांमुळे रायगडावर हल्ला करणे कठीण होते. दक्षिण दिशेला पसरलेल्या रायगडच्या  पर्वत रांगेत शेवटच्या टोकावर चांभारगड हा किल्ला आहे. उत्तरेकडील रायगडापासून सुरू झालेल्या डोंगराची रांग चांभारगड या गडाजवळ संपत असे .म्हणून स्वराज्याच्या राजधानीच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही चांभारगड हा महत्त्वाचा किल्ला होता. रायगडाचा उपदुर्ग किल्ला असलेला हा खाडीमार्गावरील एक महत्त्वाचा किल्ला होता. शिवाय महाडच्या समुद्री बंदरातून येणारा माल  राजगडा जवळच्या घाटातून नेला जात असे .महाड वरून उत्तर दिशेने जाणाऱ्या या मार्गावर देखरेख करण्यासाठी आणि व्यापार करण्याच्या दृष्टिकोनातून चांभारगड हा महत्त्वाचा किल्ला होता. म्हणूनच या गडावर शिवाजी महाराजांनी लष्करी सैन्य ठाणे निर्माण केले. शिवाजी महाराजांनी इसवी सन १६५६ मध्ये चंद्रराव मोरे यांच्याकडून चांभारगड या गडाचा ताबा घेतला. 

याच गडावर शिवाजी महाराजांनी एका शूर चर्मकाराची गडकरी म्हणून नेमणूक केली होती .जर शत्रू नजरेस आला तर या गडावरच्या माथ्यावर जाळ करून त्याची सूचना रायगडाला देण्याची व शत्रू सैन्यांचा हल्ला झाला तर त्यांचा मुकाबला करण्याची जबाबदारी या चर्मकार वीरावर होती आणि या शूरवीराने आपली कामगिरी चोख बजावली तेव्हा शिवाजी महाराजांनी खुश होऊन त्याला बक्षीस देण्याचे ठरवले .तेव्हा हा शूरपुरुष म्हणाला ,'महाराज मला द्यायचेच असेल तर, मला चामड्याच्या गठ्ठ्यातील दोऱ्याएवढी लांब जमीन मला बक्षीस म्हणून द्यावी आणि महाराजांनी जिथपर्यंत चामड्याचा दोर जाईल तेवढी जमीन त्या चर्मकार वीराला दिली होती. तेव्हापासून या गडाला चांभारगड म्हणून ओळखल्या जाऊ लागले .या गडाला महिंद्रगड म्हणूनही ओळखले जाते.

 गोवा महामार्गाला लागून असलेल्या चांभारखिंड या गावाच्या मागे असलेल्या डोंगरावर आजही या किल्ल्याचे अवशेष बघायला मिळतात. या गडावर जाण्यासाठी गावातूनच रस्ता जातो .चांभारखिंड गावापासून गडावर पोहोचण्यास एक तास लागतो. असा हा किल्ला आजही एका शूर स्वामीनिष्ठ चर्मकार वीराची आठवण करून देत उभा आहे.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏





*सामाजिक क्रांतीचे प्रणेते, संत शिरोमणी गुरु रविदास* प्रा.चंद्रशेखर चांदेकर लिखित पुस्तकात लेखकांनी संत रविदास यांच्या क्रांतिकारी जीवनाचा आलेख शब्दांतून मोठ्या परिणामकारकपणे रेखाटला आहे. त्यांचे कार्य व त्यांच्या वास्तव जीवनातील घटनांची उकल लेखकाने अतिशय समर्पक रीतीने केली आहे.               

 

*ऐसा चाहू राज मै ,जहा सबन को मिले अन्न* *छोटे बडे सब सम बसे रविदास रहे प्रसन्न*|                                 

 

*जात-पात के फेर मे उरझ रहे सब लोग, रविदास मनूषता को खात है ,जात  जात-पात का रोग*                                    संत रविदासांच्या समतावादी, मानवतावादी विचारसरणीचा सिद्धांत पुस्तकात लेखकाने मांडला आहे. प्रस्थापित समाज व्यवस्थेविरुद्ध संत रविदास यांनी बंड पुकारले ,प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्थेविरुद्ध विद्रोहाची भूमिका स्विकारून  वर्णव्यवस्थेने निर्माण केलेल्या विघातक समाज रचनेची चिरफाड केली आहे. जेव्हा प्रस्थापित समाजा विरुद्ध विद्रोह केला जातो तेव्हा भाषा ही परखड बनत जाते. रविदासांच्या परखड वाणीचा प्रभाव त्यांच्या वाणीतून जाणवतो. रविदासांना संपूर्ण मानव जातीचा उद्धार अपेक्षित होता .म्हणून त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण करून आपल्या वाणीतून समतावादी विचारांचा प्रचार- प्रसार केला. त्यांचे विचार समाजात क्रांतीची मशाल पेटवणारे होते .कोणत्याही चमत्कारी घटनेला बळी न पडता लेखकाने वैज्ञानिक दृष्टिकोनातून संत गुरु रविदास यांच्या जीवनातील वास्तव घटनेचा आढावा योग्य रीतीने घेतला आहे. तत्कालीन समाज व्यवस्थेतील जातीभेदाचे चटके सहन करूनही विश्वबंधुत्व ,समतेची भावना निर्माण करणारे रविदास हे खरे तत्त्वज्ञ होय .संत रविदासांची वाणी प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्थेविरुद्ध बंड करून उठताना विद्रोही पण जेव्हा ते मानवी जीवनातील समतावादी विचार आपल्या वाणीतून मांडतात तेव्हा त्यांची वाणी तितकीच कोमल व सुमधुर होते. पंधराव्या शतकापासून भारतीय समाज मनावर राज्य करणारे क्रांतिकारी संत गुरु रविदास  यांच्या जीवनातील वास्तव घटनेला अलंकारिक मुलामा न चढविता त्यांच्या जीवनातील घटनांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेल्या संशोधनात्मक अभ्यासातून रविदासांच्या जीवनातील कार्य व त्यांच्या जीवनातील घटनांची नोंद अतिशय समर्पकपणे समृद्ध करण्यात लेखकाची लेखनशैली यशस्वी झाल्याचे आढळते .संत साहित्याच्या क्षेत्रात प्रा. चंद्रशेखर चांदेकर यांनी प्रवेश करून रविदासांच्या वाणीची सर्वसामान्य वाचकांसाठी केलेली उकल थेट वाचकांच्या मस्तकापर्यंत जाऊन पोहोचणारी आहे .आज एकविसाव्याव्या शतकात *सामाजिक क्रांतीचे प्रणेते ,संत शिरोमणी गुरु रविदास* हे पुस्तक दिशा सूचक होकायंत्र आहे .रेल्वेच्या रूळावरून चालत असताना समोरून जर गाडी येत असेल तर रस्ता बदलावा लागतो. त्याप्रमाणेच हे पुस्तक समाजातील लोकांच्या विचाराला योग्य दिशा ,योग्य वळण लावणारे, चालना देणारे आहे. रविदासांनी जीवनाच्या अंतापर्यंत पाशवी ,दुर्धर, अस्पृश्ययेचे चटके सहन केले. हे सर्व सहन करताना प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्थेविरुद्ध विद्रोह करून उठणारे क्रांतिकारी  रविदासांना केवळ एका जाती पुरते मर्यादित करणे म्हणजे त्यांच्या कार्याला कोंडून ठेवणे होय. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी रविदासांच्या क्रांतिकारी विचारांची दखल घेऊन *द अनटचेबल* हा ग्रंथ रविदासांना अर्पण करून संपूर्ण मानव जातीला रविदासांकडे एका नवीन दृष्टीने पाहण्याची वृती निर्माण केली. रविदासांचे कार्य हे आकाशाला गवसणी घालण्याइतके  प्रचंड व महान आहे .ते एका पुस्तकात बंदिस्त करता येणे शक्य नाही. प्रा. चंद्रशेखर चांदेकर यांनी रविदासांच्या जीवनातील क्रांतिकारी घटनेचा केलेला उलगडा व त्यांनी मांडलेला वैज्ञानिक दृष्टीकोन ह्यातच लेखकाच्या यशाचे गमक आहे. माणसाला समाजात माणूस म्हणून जगण्यासाठी रविदासांच्या विचारांची नितांत गरज आहे. 600 वर्षांपूर्वीचे रविदासांच्या वाणीतील  विचार आजही तितकेच कल्याणकारी आहेत. समाजमनावर रविदासांच्या विचारांचा सकारात्मक ठसा उमटावा या उद्देशाने प्रा. चंद्रशेखर चांदेकर यांनी केलेले लेखन हे खरोखरच दिशा प्रवर्तक ठरेल यात शंका नाही. अशा साहित्याची आज नितांत गरज आहे. शिक्षण क्षेत्रात राहून रविदासांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचे त्यांचे कार्य खरोखरच प्रशंसनीय आहे. त्यांच्या प्रबोधनात्मक कार्याला माझ्या हार्दिक -हार्दिक शुभेच्छा,,!                        आपला                              *संजय देवगडे*                (अध्यापक जवाहर नवोदय विद्यालय)


*जन्म*
संत रोहिदास यांचा जन्म वाराणसी जवळील शिरूर गोवर्धनपूर गावात झाला. त्यांचे जन्मस्थान श्री गुरु रविदास जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. त्यांची आई करमा त्यांचे वडील राहू हे आहेत. त्यांचे वडील साबळे यांचे व्यवसाय करीत त्यांनी त्यांचे बहुतांश आयुष्य गंगा नदीच्या काठावर आध्यात्मिक अनुयायांमध्ये आणि सुपी संत साधू व तपस्वी यांच्या सहवासात घालविले. संत रोहिदास यांचा जन्म सन 1398 मध्ये काशी येथे झाला. महाराष्ट्रात ‘रोहिदास चांभार’ म्हणून ओळखले जाणारे संत हेच असावेत, असे दिसते.


*जीवन*
रोहिदासांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी झाला. त्यांच्या पत्नीचे नाव लोना होते. विजयदास नावाचा पुत्र असल्याचा उल्लेख परमानंद स्वामिरचित रोहिदास त्यांना पुराण ह्या ग्रंथात आढळतो. रोहिदासाच्या भक्तिवेडामुळे धंदा व संसाराचे नुकसान होऊ लागले म्हणून त्याच्या वडिलांनी वडिलोपार्जित संपत्तीचा कुठलाही हिस्सा न देता, रोहिदासाला वेगळे काढले. घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत तो झोपडी बांधून पत्नी बरोबर राहू लागला. गुरू रामानंदांच्या संपर्कामुळे रोहिदासाचे ज्ञानभांडार वाढले. तो प्रत्येक विषयावर प्रवचन देऊ लागला आणि आपल्या प्रवचनातून वेद, उपनिषदे आणि दर्शनशास्त्राच्या व्याख्या सांगू लागला.

चर्मकार समाजाच्या रविदासांचा वडिलोपार्जित धंदाही चामड्यापासून पादत्राणे व अन्य वस्तू बनविणे हा होता. परंतु, रोहितदास लहानपणापासून ईश्वरभक्तीकडेही वळले होते. वाईट कर्म त्यागून परमेश्वर भक्तीकडे जा तोच खरा मार्ग आहे, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्या जीवनातील अनेक घटना याची साक्ष देणार्‍या आहेत.

रोहिदासांचे गुरु
रोहिदास संत कबीरांचे गुरूबंधू होते. स्वामी रामानंद हे त्यांचे गुरू. रविदासांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजाला उपदेश केला. सतमार्गावरून चालण्यासाठी केलेला त्यांचा उपदेश आजही अंगीकारण्यासारखा आहे. विशेष म्हणजे त्यांच्या भक्तीसाहित्यात नेहमीच्या बोलीतले शब्द होते. त्यामुळे त्यांचे साहित्य लोकांना भावले. त्याशिवाय पारतंत्र्याविषयीची बंडखोरीही रविदासांच्या साहित्यातून दिसून येते. ज्यावेळी मुस्लिम आक्रमक भारतात शिरले. त्यावेळी त्यांनी लादलेल्या पारतंत्र्याविषयी स्पष्टपणे लिहून ठेवले आहे.


पराधिनता पाप है जान लेहु रे मीत |
रविदास दास पराधीन तो कौन करे है प्रीत ||

सामान्याने पराधिनतेला दूर करण्यासाठी निर्भय बनले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. गुलाम होणे हे पाप आहे. अशी त्यांची शिकवण होती. रोहिदासांनी कर्म हीच ईश्वररसेवा मानली होती. इथे महाराष्ट्रातल्या गोरा कुंभाराशी ते नाते जोडतात. गोरा कुंभाराने काम करता करता विठ्ठल नाम घेतले आणि त्या नादात स्वतःच्या मुलालाही त्यांनी मातीत कालवून टाकले होते. रोहिदासही काम करता करताच ईश्वरभक्तीत लीन होत होते. एकदा त्यांना गंगेवर चलण्यासाठी काही लोकांनी सांगितले. परंतु, आज एका व्यक्तीला पादत्राणे बनवून देण्याचे वचन दिले असल्याने मी येऊ शकत नाही, असे स्पष्टपणे सांगून काम हीच आपली ईश्वरभक्ती असल्याचे त्यांनी दाखवून दिले होते.

*‘मन चंगा तो कठोती में गंगा’*

मन चांगले असेल तर गंगा आपल्याजवळच असेल या आशयाचा हिंदी वाक्प्रचारही त्यांच्याच दोह्यातून आला आहे. रोहितदासांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजाला उपदेश केला. संत रोहिदासांच्या विचारांनी प्रेरीत होवून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘द अनटचेबल’ हा ग्रंथ संत रोहिदासांच्या चरणी अर्पण केला आहे.

‘हिल,मिल चलो जगतमे, फूट पडो दो नही, फूट पडी माची तो, देश नष्ट हो जाई’

एकजुटीला संत रविदासांच्या दृष्टीकोनातून अनन्यसाधारण महत्व आहे.  देशहितासाठी आपआपसात, समाजासमाजात तूट निर्माण होवू देवू नका असा अमुल्य संदेश देत, मतभेदामुळे समाज आणि देशाची अपरिमित हानी होत असल्याचेही त्यांच्या विचार धारेवरून दिसून येते. म्हणजेच, माणुस आणि देशाच्या हितासाठीच संत रोहिदासांचे उपदेश असल्याचे दिसून येते.

संत रोहिदासांच्या विचारधारेत ‘मनुष्य’ हाच धर्माचा केंद्र बिंदू होता. धर्म हा मानवांसाठी असून मानवांच्या सर्वांगीण कल्याणासाठीच धर्माने आपली भूमिका वठवावी, असे त्यांना अभिप्रेत होते. इतकेच नव्हे तर,  मूर्तिपूजे- सारख्या कर्मकांडावर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. मानवी मनाला सुयोग्य विचार करण्याची दिशा लावणे हेच सर्व सुखाचे उगमस्थान असल्याची धारणा रोहिदासांची होती.

केवळ अन्नाचा अर्थातच पोटपाण्याचा विचार न मांडता, लहान-थोर, गरिब-श्रीमंत, स्पृश्य-अस्पृश्य यांच्यात समानता असावी, सर्वांना समान अधिकार असावेत.  कोणताही भेद नसल्यासच रोहिदास प्रसन्न राहू शकतील, असे समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचेच संत रविदासांचे विचार आहेत. सर्व जीव एकाच मातीतून बनलेली भांडी आहेत. त्यांना बनविणारा ही एकच आहे. एकाच परमात्म्याची ही सारी रूपे आहेत. इथे कोणी छोटा मोठा नाही. मेहनतीलाच प्रभूभक्ती समजतो. त्याचे जीवनच यशस्वी होईल,
असे ते सांगतात.

*कार्य*
संत रोहिदास हे जातीव्यवस्थेचा सर्वात मोठा विरोधक होते, त्यांचा असा विश्वास होता की, मानवांनी निर्माण केलेल्या जातीवादामुळे माणूस माणसापासून दुरावला जात आहे. आणि जातीने माणसात फूट पाडल्यास काय फायदा?


जाति-जाति में जाति हैं, जो केतन के पात।रैदास मनुष ना जुड़ सके जब तक जाति न जात।।

*चमत्कार*
संत रोहिदास यांच्या काळात, जातीभेद शिगेला पोचला होता. जेव्हा रोहीदास यांच्या वडिलांचे निधन झाले, त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी लोकांची मदत मिळाली नाही, लोकांचा असा विश्वास होता की, तो शूद्र जातीचा आहे आणि जर त्यांचे अंत्यसंस्कार जर गंगेत झाले तर गंगा देखील प्रदूषित होईल. ज्यामुळे त्यांच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी कोणी येत नाही, मग संत रोहीदास यांनी देवाला प्रार्थना केली, त्याचवेळी वादळ येऊन त्यांच्या वडिलांचे मृत शरीर त्या वादळामुळे गंगेमध्ये विलीन झाले आणि तेव्हापासून असे मानले जाते की, काशीमध्ये गंगा उलट दिशेने वाहते.

संत रोहिदास यांच्या महानतेचा पुरावा आणि भक्ती भावनेच्या शक्तीचे त्याच्या जीवनातील बर्‍याच घटनांमध्ये आढळते. संत रोहिदासांच्या जीवनात अशा बर्‍याच घटना घडल्या आहेत, ज्या आजही जातीवादाच्या भावनेच्या पलीकडे जाऊन आणि खर्‍या मार्गावर चालून समाज कल्याणचा मार्ग दाखवतात. जरी महान संत रोहीदास आज जरी आपल्या समाजात नसले तरी त्यांचे उपदेश आणि भक्तीने समाज कल्याणाचा मार्ग आपल्याला दाखवला आहे. महान संत रोहिदास यांनी आपल्या जीवनातील कृतीतून सिद्ध केले की, माणसाने कोणत्या कुळात किंवा जातीत जन्म घेतला, यावरून तो कधीच महान होत नाही, पण जो मानवाबद्दल आदर आणि भक्ती ठेवतो तोच कायमच महान असतो आणि लोकांच्या मनावर राज्य करतो.

*संत रोहिदासांचा मृत्यू*
संत रोहिदास 120 वर्ष जगले. चितोडगड येथे सन 1527 मध्ये चितोडगड येथे संत रोहिदास यांचा मृत्यू झाला. चितोडगडातील कुंभश्याम मंदिरात स्वरचित आरती म्हणून ते मंदिराबाहेर पडले, आणि त्याच वेळी संतप्‍त पुरोहितांनी त्यांच्यावर घातक प्रहार करून त्यांचे प्रेत गंभीरी नदीत फेकून दिले असावे. त्यांची पादत्राणे जिथे मिळाली, त्याच ठिकाणी त्यांची समाधी व छत्री बांधलेली आहे.


*सामाजिक क्रांतीचे प्रणेते, संत शिरोमणी गुरु रविदास* प्रा.चंद्रशेखर चांदेकर लिखित पुस्तकात लेखकांनी संत रविदास यांच्या क्रांतिकारी जीवनाचा आलेख शब्दांतून मोठ्या परिणामकारकपणे रेखाटला आहे. त्यांचे कार्य व त्यांच्या वास्तव जीवनातील घटनांची उकल लेखकाने अतिशय समर्पक रीतीने केली आहे.                *ऐसा चाहू राज मै ,जहा सबन को मिले अन्न* *छोटे बडे सब सम बसे रविदास रहे प्रसन्न*|                                  *जात-पात के फेर मे उरझ रहे सब लोग, रविदास मनूषता को खात है ,जात  जात-पात का रोग*                                    संत रविदासांच्या समतावादी, मानवतावादी विचारसरणीचा सिद्धांत पुस्तकात लेखकाने मांडला आहे. प्रस्थापित समाज व्यवस्थेविरुद्ध संत रविदास यांनी बंड पुकारले ,प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्थेविरुद्ध विद्रोहाची भूमिका स्विकारून  वर्णव्यवस्थेने निर्माण केलेल्या विघातक समाज रचनेची चिरफाड केली आहे. जेव्हा प्रस्थापित समाजा विरुद्ध विद्रोह केला जातो तेव्हा भाषा ही परखड बनत जाते. रविदासांच्या परखड वाणीचा प्रभाव त्यांच्या वाणीतून जाणवतो. रविदासांना संपूर्ण मानव जातीचा उद्धार अपेक्षित होता .म्हणून त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण करून आपल्या वाणीतून समतावादी विचारांचा प्रचार- प्रसार केला. त्यांचे विचार समाजात क्रांतीची मशाल पेटवणारे होते .कोणत्याही चमत्कारी घटनेला बळी न पडता लेखकाने वैज्ञानिक दृष्टिकोनातून संत गुरु रविदास यांच्या जीवनातील वास्तव घटनेचा आढावा योग्य रीतीने घेतला आहे. तत्कालीन समाज व्यवस्थेतील जातीभेदाचे चटके सहन करूनही विश्वबंधुत्व ,समतेची भावना निर्माण करणारे रविदास हे खरे तत्त्वज्ञ होय .संत रविदासांची वाणी प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्थेविरुद्ध बंड करून उठताना विद्रोही पण जेव्हा ते मानवी जीवनातील समतावादी विचार आपल्या वाणीतून मांडतात तेव्हा त्यांची वाणी तितकीच कोमल व सुमधुर होते. पंधराव्या शतकापासून भारतीय समाज मनावर राज्य करणारे क्रांतिकारी संत गुरु रविदास  यांच्या जीवनातील वास्तव घटनेला अलंकारिक मुलामा न चढविता त्यांच्या जीवनातील घटनांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेल्या संशोधनात्मक अभ्यासातून रविदासांच्या जीवनातील कार्य व त्यांच्या जीवनातील घटनांची नोंद अतिशय समर्पकपणे समृद्ध करण्यात लेखकाची लेखनशैली यशस्वी झाल्याचे आढळते .संत साहित्याच्या क्षेत्रात प्रा. चंद्रशेखर चांदेकर यांनी प्रवेश करून रविदासांच्या वाणीची सर्वसामान्य वाचकांसाठी केलेली उकल थेट वाचकांच्या मस्तकापर्यंत जाऊन पोहोचणारी आहे .आज एकविसाव्याव्या शतकात *सामाजिक क्रांतीचे प्रणेते ,संत शिरोमणी गुरु रविदास* हे पुस्तक दिशा सूचक होकायंत्र आहे .रेल्वेच्या रूळावरून चालत असताना समोरून जर गाडी येत असेल तर रस्ता बदलावा लागतो. त्याप्रमाणेच हे पुस्तक समाजातील लोकांच्या विचाराला योग्य दिशा ,योग्य वळण लावणारे, चालना देणारे आहे. रविदासांनी जीवनाच्या अंतापर्यंत पाशवी ,दुर्धर, अस्पृश्ययेचे चटके सहन केले. हे सर्व सहन करताना प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्थेविरुद्ध विद्रोह करून उठणारे क्रांतिकारी  रविदासांना केवळ एका जाती पुरते मर्यादित करणे म्हणजे त्यांच्या कार्याला कोंडून ठेवणे होय. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी रविदासांच्या क्रांतिकारी विचारांची दखल घेऊन *द अनटचेबल* हा ग्रंथ रविदासांना अर्पण करून संपूर्ण मानव जातीला रविदासांकडे एका नवीन दृष्टीने पाहण्याची वृती निर्माण केली. रविदासांचे कार्य हे आकाशाला गवसणी घालण्याइतके  प्रचंड व महान आहे .ते एका पुस्तकात बंदिस्त करता येणे शक्य नाही. प्रा. चंद्रशेखर चांदेकर यांनी रविदासांच्या जीवनातील क्रांतिकारी घटनेचा केलेला उलगडा व त्यांनी मांडलेला वैज्ञानिक दृष्टीकोन ह्यातच लेखकाच्या यशाचे गमक आहे. माणसाला समाजात माणूस म्हणून जगण्यासाठी रविदासांच्या विचारांची नितांत गरज आहे. 600 वर्षांपूर्वीचे रविदासांच्या वाणीतील  विचार आजही तितकेच कल्याणकारी आहेत. समाजमनावर रविदासांच्या विचारांचा सकारात्मक ठसा उमटावा या उद्देशाने प्रा. चंद्रशेखर चांदेकर यांनी केलेले लेखन हे खरोखरच दिशा प्रवर्तक ठरेल यात शंका नाही. अशा साहित्याची आज नितांत गरज आहे. शिक्षण क्षेत्रात राहून रविदासांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचे त्यांचे कार्य खरोखरच प्रशंसनीय आहे. त्यांच्या प्रबोधनात्मक कार्याला माझ्या हार्दिक -हार्दिक शुभेच्छा,,!                        आपला                              *संजय देवगडे*                (अध्यापक जवाहर नवोदय विद्यालय)

श्री. अशोक खाडे MR.ASHOK KHADE

मराठी माणुस ....व्यवसाय करू शकत नाही ????
वाचा श्री अशोक खाडे यांच्या यशाचा मार्ग

ठाणे दिवा पब्लिक स्कूल उत्कृष्ठ कामगिरी

 ठाणे दिवा पब्लिक स्कूल उत्कृष्ठ कामगिरी

POPULAR POSTS